विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?

सांगली : ‘‘विशाल पाटील हे समजूतदार आहेत. वसंतदादांचे ते नातू आहेत. देश संकटात(apa citation) आल्यावर वसंतदादा पाटील यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी कोणताही व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थ न पाहता शत्रूशी युद्ध केले. विशाल यांचा ‘डीएनए’ तोच आहे, त्यांचा आणि माझा आजही उत्तम संवाद आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, क्रांतिकारी विचारापेक्षा विशाल वेगळी भूमिका घेतील,’’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सांगलीत शनिवारी (ता. २०) सकाळी ते पत्रकारांशी(apa citation) बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले खासदार राऊत यांनी सांगलीत मुक्काम करत भेटीगाठी घेत आहेत.

खासदार राऊत म्हणाले, ‘‘विशाल पाटील हे महाविकास आघाडीच्या कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मनातही विशालबाबत प्रेम आहे; पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. अर्ज माघारीच्या म्हणजे २२ तारखेपर्यंत वाट पाहू, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच आमदार विश्वजित कदम हेदेखील दोन दिवसांत सांगलीत येऊन मविआचा मेळावा घेतील.’’

‘‘महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर, त्याचे स्वागत केले पाहिजे. इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे का असू नयेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. इंडिया आघाडीत एकत्र बसून निर्णय घेतले जातात. या पदासाठी आम्ही अनेक वर्षे शरद पवार यांच्याकडे अपेक्षेने पाहात होतो,’’ असे राऊत म्हणाले.

‘‘इंडिया’ आघाडीला देशात लोकसभेच्या किमान ३०० जागा मिळतील. महाराष्ट्रात ३५ पेक्षा अधिकचे ध्येय आहे. देशात भाजप १८० ते २०० जागांपर्यंत मर्यादित राहील. ‘एनडीए’ २३० च्या पुढे जाणार नाही. राज्यातील लक्षवेधी लढत बारामतीत होईल. खासदार सुप्रिया सुळे या मोठ्या फरकाने विजयी होतील,’’ असे राऊत म्हणाले.

हेही वाचा :

‘या’ नेत्याला शिंदेकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का; आता योग शिबिरासाठी सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार

कोल्हापूरात रात्रीस खेळ चाले.. राजकारणाच्या डावात भंडारा, परडी, लिंबू-मिरच्या अन् भानामती

जोतिबा मंदिर सलग 79 तास खुले राहणार; मानाच्या सासनकाठ्या डोंगराकडे मार्गस्थ, चैत्र यात्रेला प्रारंभ

‘मविआ’विरोधात बंड कराल तर… ; माघारीसाठी विशाल पाटलांवर काँग्रेसचा प्रचंड दबाव