PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल, अडचणी वाढणार?

पंतप्रधान (pm)नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू केली आहे.
राज्यासह देशात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे, अशातच सभा, प्रचार दौरे, प्रचार सभा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. अशातच एका प्रचार सभेच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान (pm)नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
‘देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे’, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्याचा दाखला मोदींनी सभेत दिला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि माकपने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

काँग्रेस आणि माकपने मोदींच्या वक्तव्यावर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाने आता या दोन्ही तक्रारींची दखल घेतली आहे. मोदींच्या भाषणाची चौकशी सुरू झाली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं मोदी म्हणाले होते.

हेही वाचा :

सावधान, झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करताय?

साखर सम्राटांच राजकारण आणि सा.रे. पाटलांचं बंड

भाजप कार्यकर्त्याने माझा हात धरला, माझी साडी खेचली; काँग्रेसच्या महिला नेत्याचा गंभीर आरोप