लतादीदींचा स्वर म्हणजे आत्मा-परमात्म्याला जोडणारी तार!

असं म्हणतात सच्चा सूर आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. लता मंगेशकर (soul)यांचा सूर म्हणजे आत्मा आणि परमात्म्याला जोडणारी तार आहे, जी सदैव झंकारत राहते. त्यांचा स्वर म्हणजे संगीताची परिभाषा आहे. लतादीदी म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे लतादीदी… माझ्यासाठी दोन्ही समानार्थी शब्द! अशा शब्दांत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज लतादीदींचे स्मरण केले.

या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ अमिताभ बच्चन यांना उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात हा पुरस्कार सोहळा रंगला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बिग बी अमिताभ म्हणाले, ‘लतादीदींनी मला आणि माझ्या कुटुंबाला(soul) नेहमी प्रेम दिले. मी त्यांच्यासोबत स्टेजवर कार्यक्रमही केले. स्टेजवर मी पहिले गाणे लतादीदी यांच्या सोबत गायले. तेही न्यूयॉर्क येथील एका भव्य कार्यक्रमात! बाबूजी म्हणायचे लतादीदींचा आवाज म्हणजे मधाची धार. मधाची धार कधीच तुटत नाही… दीदींचा स्वरही अगदी तसाच… कधीही न तुटणारा!’ यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिषेक बच्चन, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते.

संगीत सेवा पुरस्कार ए. आर. रहमान यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यासाठीचा आनंदमयी पुरस्कार (आशा भोसले पुरस्कृत) ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ला मिळाला. यजुवेंद्र महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. साहित्य सेवेचा ‘वाग्विलासिनी’ पुरस्कार मंजिरी फडके यांना तर संगीत सेवेसाठी रुपकुमार राठोड यांना पुरस्कार मिळाला.

मोहन वाघ पुरस्कार ‘गालिब’ नाटकाला मिळाला. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याने पुरस्कार स्वीकारला. पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाटय़ सेवा), रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना देणारा ‘श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी’ हा कार्यक्रम भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केला. हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये विभावरी आपटे-जोशी यांची एकल संगीत मैफल सादर झाली.

अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार म्हणजे आनंदाची परिसीमा आहे. एका असामान्य गायक कलावंताच्या नावाने, एका असामान्य परिवाराकडून आणि एका असामान्य अभिनेत्याच्या उपस्थितीत मला हा पुरस्कार मिळतोय. हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. हा तुम्हा सगळय़ांचा पुरस्कार आहे.

हेही वाचा :

दारू पिऊन लिव्हर डॅमेज झाल्यास टेन्शन घेऊ नका, डॉ सरीनने घरगुती उपाय

भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला