आठवडाभर मीटिंग्स अटेंड करून, मेल्स वाचून, सतत काम करून पिट्ट्या पडला ना ? आठवडाभर ऑफीसमध्ये(extreme fiber) मान मोडून काम केल्यानंतर प्रत्येकालाच एक शांत आणि थोडा मजेशीर वीकेंड हवा असतो. तुम्हालाही ना ? मात्र घरी बसल्यावर , टीव्ही ऑन केल्यानंतर चांगला शो शोधत बसण्यापेक्षा आणि काहीच मिळालं नाही तर तेच तेच जुने चित्रपट किंवा आधीच पाहिलेल्या वेब सीरिज पुन्हा बघणं किती कंटाळवाणं होतं… त्यापेक्षा तुम्हाला हवं असलेलं मनोरंजन , चुटकीसरशी मिळालं तर ?
आता ‘एअरटेल एक्स्ट्रीम फायबर’(extreme fiber) द्वारे तुमची ही अडचण खरंच एका झटक्यात दूर होईल. जेव्हा आठवडाभर काम करून वीकेंड निवांत घरी घालवायची इच्छा असते तेव्हा विविध OTT subscriptions मॅनेज करणं हे खरंच जिकीरीचं आणि तेवढंच कंटाळवाणं होतं. पण एअरटेल एक्स्ट्रीम फायबरमुळे तुम्हाला मनोरंजनाचे सगळे पर्याय एकाच जागी मिळू शकतात. त्यामुळे वन स्टॉप एंटरटेनमेंट हब हा उत्तम ऑप्शन होतो. चित्रपट, वेब सीरिज, शो, लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि आवडते स्पोर्ट्स यांची एकत्र लायब्ररी झाली तर किती मस्त होईल ना !
मनोरंजनाचे सगळे ऑप्शन्स एकाच छताखाली उपलब्ध
एअरटेल एक्स्ट्रीम फायबर हे अतिशय लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे इथे सर्व ओटीटी चॅनेल्स एकाच जागी उपल्बध होतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळी सबस्क्रिप्शन चॅनेल्स सांभाळत बसायची गरजच नाही. एवढंच नव्हे तर तुम्हाला 350 पेक्षाही अधिक टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळतो. एक्स्ट्रीम मध्ये हायस्पीड इंटरनेट तसेच डिस्ने + हॉटस्टार, झी5, आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ हेही अव्हेलेबल आहे.
सुपरफास्ट स्पीड
एअरटेल एक्स्ट्रीम फायबरमध्ये तुम्हाला सुपरफास्ट इंटरनेट स्पीडचा ऑप्शन मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट हाय-स्ट्रीममध्ये पाहू शकता किंवा तुमच्या आवडत्या वेबसीरिजचे, टीव्ही सीरियलचे सगळे भाग अगदी काही सेकंदातच डाऊनलोड करून ठेवू शकता. कोणत्याही बफरिंगशिवाय तुम्ही या ब्राऊझिंगचा आनंद लुटू शकता.
लहान मुलांसाठी सुरक्षित मनोरंजन
अनेक व्ह्यूअर्ससाठी एअरटेल एक्स्ट्रीम फायबर हा पहिला पर्याय आहे कारण तेथे पॅरेंटल कंट्रोलचा पर्यायही सहज उपलब्ध आहे. तुमच्या गैरहजेरीत तुमची मुलं काय पाहतात, विचित्र काही त्यांच्या नजरेस पडत नाही ना याची तुम्हाला काळजी करण्याची गरजच नाही. एअरटेल एक्स्ट्रीम फायबरमध्ये पॅरेंटल कंट्रोलचा ऑप्शन हा वापरण्यासाठी अतिशय सोपा, सुलभ आहे. त्यामुळे मुलांनी काय बघावे आणि काय नाही, याची सीमारेषा तुम्ही सहज आखून देऊ शकता.
अनलिमिटेड मनोरंजन
एअरटेल एक्स्ट्रीम फायबर हे फक्त तुमच्या टीव्हीपुरतं मर्यादित नाहीये. तुमचा आवडीचा शो, चित्रपट किंवा इतर काही याचा आनंद तुम्ही फोन, टॅब आणि लॅपटॉपवर, घरात कुठेही घेऊ शकता. त्यामुळे जेवण तयार करतानाही किंवा घरातलं एखादं काम करतानाही तुम्ही आवडीचा कार्यक्रम पाहू शकता.
स्मार्ट रेकमेंडशन
एअरटेल एक्स्ट्रीम फायबर बद्दल आणखी एक उत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही काय पहावं, तुम्हाला काय आवडेल याचीही काळजी इथे घेतली जाते. स्मार्ट रेकमेंडशन फीचरमुळे तुम्हाला आवडतील असे विविध कार्यक्रम, चित्रपट सुचवले जातात. त्यामुळे आज काय पहावं, हे शोधत वेळ घालवायला लागणार नाही. तुम्हाला आवडतील अशा कार्यक्रमांचा आनंद घेत तुम्ही वीकेंड एन्जॉय करू शकता.
निष्कर्ष काय ?
एअरटेल एक्स्ट्रीम फायबर हे उत्तम एंटरटेनमेंट हब आहे. हायस्पीड कनेक्टिव्हिटी, एकाच जागी भरपूर कंटेट, सुरक्षितता या सगळ्या फीचर्समुळे तुम्ही निर्धास्त होऊन एकाच जागी मनोरंजनाचा आनंद लुटू शकता आणि म्हणू शकता ‘मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तयार ?’ . एवढंच नव्हे तर एका महिन्याच्या सबस्क्रीप्शनचे प्लान्स फक्त 699* रुपयांपासून सुरू होतात. एअरटेलच्या वेबसाइटवर जाऊ तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या दरात एंटरटेनमेंटचा आनंद लुटण्यासाठी तयार व्हा…
हेही वाचा :
इचलकरंजीतील कुख्यात ‘केसरी गँग’चे तिघे गुंड जिल्ह्यातून हद्दपार
स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जागा लढविणार, राजू शेट्टी आजही ठाम
‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशात निवडणुका होणार नाहीत…’ अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीचा दावा