आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील अनेक महत्वाच्या(match) सामन्यांमध्ये पावसाने अडथळा निर्माण केला आहे. आज सुपर ८ फेरीत भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातही पाऊस महत्वाची भूमिका बजाऊ शकतो. हा सामना अँटिग्वाच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान सामना पावसामुळे रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल? जाणून घ्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यावेळी पाऊस(match) हजेरी लावणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यावेळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुपारच्या वेळी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणांवर समाधान मानावं लागेल. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांच्या टेन्शनमध्ये वाढ होणार आहे. कारण भारतीय संघाचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर बांगलादेश संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सामना रद्द झाल्यास पुढील सामना दोन्ही संघांसाठी सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ सुपर सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.
तर अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी आहे. भारतीय संघाने आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि २३ जून रोजी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. यासह भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.
हेही वाचा :
मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले…
छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
महाराष्ट्रात आरक्षणावरुन ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला, ओवैसींनी केली मोठी मागणी!