महाराष्ट्रात खळबळ! टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग

शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसून एका २१ वर्षीय तरुणाने(news) महिला वकिलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारली. इतकंच नाही, तर त्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक परिसरातील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार(news) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामशंकर गौतम उर्फ संदीप पांडे (वय २१) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पेशाने वकील असून दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफिस आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेसातच्या सुमारास महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन टॉयलेटमध्ये गेली होती.

यावेळी आरोपी तरुण हा टॉयलेटमध्ये उपस्थित होता. महिलेने त्याला व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने बाहेर गेल्यासारखं केलं. पण जेव्हा महिला टॉयलेटला गेली, तेव्हा तो पुन्हा आतमध्ये आला. त्याने दरवाजा आतून लावून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरड केली असता, आरोपीने तिचा गळा दाबला. इतकंच नाही, तर त्याने महिलेच्या पोटात लाथ मारुन तिला खाली देखील पाडलं. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा :

दोन महिन्यात सोनं 11 हजारांनी महागले!

वर्षा गायकवाड दलित असल्याने उमेदवारी नाकारली, मिलिंद देवरा आरोप

वीकेंडला सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत व्हेज फ्रॅकी