वीकेंडला सकाळच्या नाश्त्यात बनवा चटपटीत व्हेज फ्रॅकी

वीकेंडला सकाळी चटपटीत खायचे असेल तर व्हेज(veg) फ्रॅकी बनवू शकता.


वीकेंडला सकाळी नाश्त्यात काही चवदार खायची इच्छा होत असेल तर व्हेज (veg)फ्रॅकी बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवदरा आहे. चला तर मग जाणून घेऊया व्हेज फ्रॅकी कसा बनवावा.

फ्रॅकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप गव्हाचे पीठ

1 कप मैदा

1 चमचा दही

मीठ चवीनुसार

कृती

एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, दही आणि मीठ मिक्स करावे. नंतर गरजेनुसार पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे. 15 मिनिटे पीठ झाकून ठेवावे. नंतर गोलाकार चपाती लाटून घ्यावी.

फ्रॅकी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

4 उकडलेले बटाटे

तेल

जीरं

मोहरी

उभी चिरलेली शिमला मिरची

उभा चिरलेला टोमॅटो

आलं-लसूण पेस्ट

लाल तिखट

हळद

कोथिंबीर

टोमॅटो सॉस

हिरवी चटणी

पत्ता कोबी

कांदा

फ्रॅकी मसाला कसा बनवावा

फ्रॅकी मसाला बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करावे. नंतर जीरं, मोहरी, कादां, आलं आणि लसूण पेस्ट टाकून चांगले मिक्स करावे. नंतर त्यात लाल तिखट, हळद टाकावे. नंतर उकडलेला बटाटा मिक्स करावे. चवीनुसार मीठ टाकावे. गॅस बंद करावा. फ्रॅकी मसाला तयार आहे.

व्हेज फ्रॅकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

व्हेज फ्रॅकी बनवण्यासाठी बनवलेली पोळी घ्यावी. त्यावर टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी लावावी. त्यावर फ्रॅकी मसाला लावावा. नंतर त्यावर उभी चिरलेली शिमला मिरची, उभा चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला कांदा टाकावा. नंतर कोथिंबीर टाकावी आणि गोल रोलचा आकार द्यावा. परत तव्यावर हा रोल गरम करावा. तुमचा व्हेज फ्रॅकी तयार आहे.

हेही वाचा :

महायुतीमध्ये प्रचारादरम्यान धुसफुस, गजानन किर्तिकर

शालेय शिक्षण विभागाचा नवा आदेश! 

संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा मशरुम कॉर्न मसाला, येईल तोंडाला चव!