पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये पार पडणार सभा

आज 20 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य(State) पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये होणार सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, 20 एप्रिल रोजी नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्याच नावे ओळखल्या जाणाऱ्या असर्जन रोडवरील मोदी ग्राउंड येथे भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.
गोरेगाव पूर्व येथे 23 आणि 24 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार
गोरेगाव पूर्व येथे 23 आणि 24 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. गोरेगाव मधील रहिवाशांनी पाणी जपून वापरणं गरजेच आहे.(State)

पी दक्षिण विभागातील वीरवाणी इंडस्ट्रील इस्टेट,पश्चिम द्रुतगती मार्ग,गोरेगाव पूर्व येथील जलवाहिनी बदलण्याच्या कामास्तव 23 आणि 24 एप्रिल दरम्यान 24 तासांसाठी काही भागात 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे
पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग
पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी देशभरात पार पडले. महाराष्ट्रातही पाच जागांवर मतदान झाले. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर नागपुरात सर्वात कमी टक्के मतदान झाले. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. येत्या 2 महिन्यांमध्ये शिंदे दिसणार नाहीत, भारतीय जनता पक्षावर टीका करताना बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं. वसंत मोरे यांच्याकडून पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल. शुक्रवारी शक्तीप्रदर्शन टाळत, एकटे जात वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये सभा होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आज मोदी यांची सभा पार पडेल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

हेही वाचा :

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

यूट्यूबवर राहुल गांधींचा डंका! पंतप्रधान मोदींचे चॅनल चौथ्या क्रमांकावर

मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य