गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत व इम्रान हुसेन हे मंत्री (minister)जंतरमंतरवर झालेल्या ‘सामूहिक उपवासात’ सहभागी झाले.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी रविवारी येथील जंतरमंतरवर एक दिवसाचे उपोषण केले. भाजप हुकूमशाहीचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला.(minister)
पक्षाचे अनेक कार्यकर्ते व समर्थक यांनी देशभक्तीपर गीते गात आणि केजरीवाल यांच्या गजाआडच्या प्रतिमा दर्शवणारे पोस्टर्स झळकावत या उपोषणात भाग घेतला. इतर राज्यांमध्ये, तसेच बोस्टनमधील हार्वर्ड चौक, लॉस एंजल्समधील हॉलीवूड साइन, वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय राजदूतावासाबाहेर, न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये, त्याचप्रमाणे टोरांटो, लंडन व मेलबर्न यांसह परदेशातही अशाच प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत व इम्रान हुसेन हे मंत्री जंतरमंतरवर झालेल्या ‘सामूहिक उपवासात’ सहभागी झाले.
हेही वाचा :
‘गरीबी हटाव’चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र
बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर… 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत