मुंबईत अग्नितांडव! नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये(industrial) भीषण आगीची घटना घडली आहे. नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे व्हिडिओ समोर आले आहेत. आग इतकी भीषण(industrial) आहे की, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आगीचे लोट हे रस्त्यापर्यंत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक देखील आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दुरवर धुराचे लोट पसरलेले दिसत आहेत.

नवी मुंबईतील MIDC मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिची मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा :

“पक्षात या नाहीतर जेलमध्ये जा”, आपच्या आणखी ‘या’ चार नेत्यांना होऊ शकते अटक

शोलेचा जेलर, देवानंद आणि जॉनी लिव्हर, महाराष्ट्राचे राजकारण तापले, झाली बॉलीवूड अभिनेत्यांची एन्ट्री

प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या