‘यात हार्दिक पांड्याची चूक….’, BCCI च्या माजी अध्यक्षाचं मुंबई इंडियन्सच्या कर्णधारबाबत मोठं वक्तव्य

मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाच्या प्रक्रियेशी हार्दिक पंड्याचा(bcci apps) संबंध नाही, त्यात त्याची काहीही चूक नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवू नये, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार आणि दिल्ली संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी व्यक्त केले.

मुंबई संघाला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला(bcci apps) दूर करून यंदा गुजरात संघातून घेण्यात आलेल्या हार्दिककडे कर्णधारपद देण्यात आले. हा बदल मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेला नाही. परिणामी, प्रत्येक सामन्यात त्याची हुर्यो उडवण्यात येत आहे.

हार्दिकची अशाप्रकारे हुर्यो उडवणे योग्य नाही. संघ मालक कर्णधार निवडत असतो हे सर्वच लीग स्पर्धांत घडत असते. इतकेच नव्हे कोणत्याही खेळात कर्णधाराची नियुक्ती संबंधितांकडून केली जात असते, त्यामुळे एखादा असा बदल झाला तर तो स्वीकारायला हवा, असे गांगुली यांनी म्हटले.

दिल्लीविरुद्ध मुंबई यांच्यात उद्या होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली म्हणाले, रोहित शर्माचा दर्जा वेगळा आहे. फ्रँचाईस लीगमधील कर्णधारपद आणि देशाचे नेतृत्व याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे हार्दिकचा यात दोष नाही.

जवळपास दीड वर्षानंतर पुनरागमन करणारा रिषभ पंत आता पूर्वीच्या शैलीत फलंदाजी करत आहे. सलग दोन सामन्यांत त्याने अर्धशतके केलेली आहेत. तसेच यष्टीरक्षणातही तो चमक दाखवत आहे, त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पंतला प्राधान्य मिळणार, असे बोलले जात असले तरी गांगुली मात्र पंतच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत सावध आहेत. अजून एका आठवड्यानंतर आपण पंतच्या पुनरागमनाबाबत ठामपणे सांगू शकू, असे गांगुली यांनी सांगितले.

हेही वाचा :

ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या भावात दररोज बदल

स्वतःसाठी दररोज एक तास द्या, निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

खासदारांची तिकिटं कापल्याने शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?