मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चार मुलांना मारहाण(scammers) केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चार तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
हात पाय बांधून एका बंद खोलीत या मुलांना बेदम मारहाण(scammers)करण्यात आल्याचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. मोक्याच्या गुन्ह्यातून सुटलेला गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या साथीदारांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तरुणाचे पाय बांधून चौघांच्या मदतीने श्याम लाखे हा लोखंडी पाईपने मारहाण करताना दिसत आहे.
या घटनेनंतर शहरातून सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त झाल्यानंतर याची दखल शहापूर पोलिसांनी घेतली. याप्रकरणी लाखे याच्यासह त्याचे वडील, आदर्श उर्फ आद्या, माया, सुरज यांसह एकूण ७ जणांवर (सर्व रा.दत्तनगर, शहापूर) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर अपहरण, बाल न्याय कायद्यासह विविध सहा कलमाखाली गुन्हा दाखल झाला.
या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर (वय19) यांसह चार मुले (सर्व रा.जयभीमनगर, इचलकरंजी)जखमी झाली आहेत. मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाखे याच्या घरी दत्तनगर गल्ली नं. ४ मध्ये घडली असून याची नोंद पोलिसांत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, डुक्कर मारण्याचा कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी चार मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि शाम लाखे याच्या घरी आणले.
मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हात पाय धरले. त्यानंतर लाखे याने त्याला पुन्हा शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्धमान चौकाकडे दिसायचे नाही. इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून आता मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली आणि जवळील ३ हजार रुपये देण्यास भाग पाडले.
बेदम मारहाण करताना मुलांचा आरडाओरडा हृदयद्रावक होता. या मारहाणीचा व्हिडिओ चित्रिकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून संपूर्ण शहरभर पसरला. दरम्यान आज याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
घरातीलच पदार्थ खाऊन आणा ब्लड प्रेशर नियंत्रणात
Netflix युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, लवकरच फ्री सेवा सुरू होणार?
अजित पवारांच्या अडचणी वाढणार? शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चीटला ईडीचा विरोध