थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला चेक न वटल्याने संगमनेरातील व्यापारी(merchant) रुपेश सुभाष वर्मा यांना दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि 4 लाख रुपये दंडाची शिक्षा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांनी ठोठावली.
संगमनेर बाजारपेठेमधील सुवर्णकार व्यापारी (merchant)रुपेश वर्मा याने संगमनेर येथील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. ते थकीत झाल्यानंतर रुपेश वर्मा यांनी थकीत रक्कम देण्यापोटी पतसंस्थेला 2 लाख 48 हजार 80 रुपयांचा धनादेश दिला. दिलेला चेक न वटता परत आल्यानंतर पतसंस्थेने संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. जे. गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी संस्थेचे वकील राजेश भुतडा यांनी न्यायालयासमोर पतसंस्थेची बाजू मांडत संस्थेतर्फे मॅनेजर गजाजन ठाकरे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.
फिर्यादी व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपी रुपेश सुभाष वर्मा याला दोषी ठरवत न्यायाधीश गायकवाड यांनी शिक्षा सुनावली. पतसंस्थेचे वकील राजेश भुतडा यांना वकील स्वप्नील एम. उपरे यांनी सहाय्य केले.
हेही वाचा :
प्रौढ व्यक्तीने विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; हायकोर्ट नेमकं काय म्हणालं?
मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; गजानन राणेंसह इतर २० साथीदारांवर गुन्हा
भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..