फसवे बारामती मॉडेल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच उमेदवार(model 3) आपापल्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना, विकासाचे आश्वासन देताना मतदार संघाचा बारामती करू असे ठामपणे सांगायचे. विकासाचे मॉडेल म्हणून बारामतीकडे पाहिले जायचे. पण बारामती मतदारसंघाचा खरोखरच सर्वांगीण विकास झालेला आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येईल. कारण बारामती लोकसभा मतदारसंघ हा विकासापासून वंचित असल्याची कबुली दस्तूर खुद्द अजितदादा पवार यांनी दिली आहे.

दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी हे प्रचारात गुजरात मॉडेल(model 3) आणत होते. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातचा किती प्रचंड प्रमाणावर विकास झाला आहे असे ते या गुजरात मॉडेलच्या माध्यमातून देशभर सांगत फिरत होते. तेव्हा शरद पवार हे गुजरात मॉडेलला फसवे मॉडेल आहे. असे राज्यभर सांगत फिरत होते. आता त्यांचे पुतणे अजितदादा पवार हे बारामती मॉडेल बद्दल जाहीरपणे बोलताना दिसत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विकासाचे म्हणून बोलले जात असलेले बारामती मॉडेल फसवे आहे.

सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात आणि देशात चर्चेत आहे. कारण अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात इथे लढत होत असून ननंद भावजय यांच्यातील ही निवडणूक महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज निवडणूक आहे.

या मतदारसंघात अजितदादा पवार यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत. भोर वेल्हा परिसरात प्रचार सभेत बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. हे चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यात तीन वेळा खासदार होत्या पण तरीही भोर वेल्हा वगैरे परिसराचा विकास झालेला नाही. असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

अजित दादा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांचा विकास झालेला नाही असा आरोप आत्ता करताना दिसतात. यापूर्वी त्यांनी याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी फारकत घेतल्यानंतर ते बारामतीच्या संदर्भात बोलू लागले आहेत.

बारामतीचा खऱ्या अर्थाने विकास हवा असेल तर आता तिथल्या मतदारांनी वेगळा विचार केला पाहिजे. सुनेत्रा पवार यांना लोकसभेवर पाठवले पाहिजे. असे त्यांना म्हणायचे आहे. केवळ भाषणे करून विकास होत नाही तर प्रशासनावर पकड असावी लागते. माझी शासन यंत्रणेवर जबरदस्त पकड आहे त्यामुळे विकास कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवून देईन. असे ते प्रचार सभेतून सांगताना दिसतात.

बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांचा विकास झाला नाही असे ते सतरा अठरा वर्षानंतर बोलतात. यापूर्वी का बोलले नाहीत असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेला आहे. एकूणच बारामती सारखा विकास महाराष्ट्रातील कुठल्याच लोकसभा मतदारसंघात झालेला नाही असे पूर्वी प्रत्येक जण सांगायचा. तुम्ही मला निवडून द्या मी आपल्या मतदारसंघाचा बारामती करेन असे सांगण्याची एक फॅशनच काही वर्षांपूर्वी होती.

काही वर्षांपूर्वी शरद पवार हे नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेल बद्दल ते कसे फसवे आहे हे सांगत होते आता त्यांचे पुतणे अजितदादा पवार हे बारामती मतदारसंघाचे मॉडेल कसे फसवे आहे हे सांगताना दिसत आहेत. हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला राजकीय सूड आहे असे म्हणावे काय?

हेही वाचा :

सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार, एक काका, दुसरे दादा…; राऊतांचा निवडणूक आयोगावरही घणाघात

टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा फॉर्म्युला तयार, पाहा संघाची ताकद काय?.

सांगलीच्या जागेवरुन नेमकं काय घडलं, शरद पवार यांनी सांगितली गोटातील बातमी