‘या’ दिवशी महिलांसाठी मोफत बस प्रवास! 13 मार्गांवर फुकटात फिरता येणार

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महिलांना(International) पुणे महानगर परिवहन मंडळाकडून खास गिफ्ट देण्यात आले आहे. ८ मार्च रोजी महिलांना तेजस्विनी बस सेवेमध्ये संपूर्ण दिवस मोफत प्रवास करता येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आहे.तेजस्विनी बस सेवा कोणत्या मार्गांवर मोफत असेल? :महिला दिनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १३ मार्गांवर तेजस्विनी बस मोफत धावणार आहे. हे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

कात्रज – हाउसिंग बोर्ड
कात्रज – कोथरूड डेपो
स्वारगेट – हडपसर
निगडी – हिंजवडी
भोसरी – निगडी
स्वारगेट – धायरेश्वर
कोथरूड डेपो –(International) पुणे स्टेशन
एनडीए गेट – पुणे मनपा
हडपसर – वारजे माळवाडी
भेकराईनगर – पुणे मनपा
मार्केट यार्ड – पिंपळे गुरव
पुणे स्टेशन – कोंढवा खुर्द
चिखली – डांगे चौक

महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि विनामूल्य प्रवासाचा उपक्रम :
या बस सेवेसाठी महिलांना कोणतेही तिकीट काढण्याची गरज नाही. पीएमपी प्रशासनाने या बसमध्ये महिला वाहकांची नियुक्ती केली असून, आगार प्रमुखांना महिलांना पुष्पगुच्छ देण्याचे निर्देश दिले आहेत.पीएमपीएमएलच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशांना एक दिवसासाठी मोफत प्रवासाचा (International)लाभ मिळणार आहे. महिलांना प्रवासासाठी सुरक्षित आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

हेही वाचा :

मासिक पाळी दरम्यान मंदीर आणि किचनमध्ये जाणं योग्य की अयोग्य? 

सोन्याच्या तस्करीत अभिनेत्री अडकल्याने खळबळ

जिच्यावर बलात्कार अश्लिल फोटो व्हायरल केले तिच्याशीच करावं लागणार लग्न कोर्टाचा निर्णय