मुंबई (mumbai)विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, प्रा. बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या या चारही अध्यासन केंद्रांसाठी कलिना संकुलातील रामकृष्ण बजाज भवन (संस्कृत भवन) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चारही अध्यासन केंद्राच्या स्वतंत्र जागेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. रामकृष्ण बजाज संस्कृत भवन येथे स्थलांतर होत असलेल्या या अध्यासन केंद्राना स्वतंत्र अभ्यासवर्ग खोल्या, सेमिनार हॉल, प्रशासकीय कार्यालये आणि ग्रंथालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसह सुसज्ज यांत्रिकी उपकरणे आणि आवश्यक मनुष्यबळ मानव संसाधन विभागामार्फत पुरविले जात आहे.(mumbai)
आजमितीस हिंदू अध्यासन केंद्रातर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर दोन वर्षे पूर्णवेळ अभ्यासक्रम राबवला जात आहे. तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. प्रा. बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून वर्षभर विविध परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळा आणि अभिनव उपक्रम राबविले जात आहेत.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/05/image-324.png)
लवकरच या अध्यासन केंद्रातर्फे पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. मुंबई विद्यापीठात गेल्या काही वर्षांत स्थापन करण्यात आलेल्या या अध्यासन केंद्रांचे बळकटीकरण करून एका छताखाली आणण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….
तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश