कोल्हापूर : ‘भावी’ नगरसेवक प्रचारात राबला, लीड दिलं; आता उमेदवारीचे वेध…

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा(corporater) टक्का वाढला आहे. कोल्हापूर तिसऱ्या टप्प्यापर्यंत राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर मतदारसंघातील मतदानाची टक्के वारी पाहता उमेदवारांचे आणि संबंधित यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन फायदेशीर ठरत आहे. त्यात शहरात आणि महापालिकेच्या क्षेत्रात दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच ईर्षा लागून राहिली होती. त्यात आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीमुळे नेत्यांची मर्जी वाढवण्यासाठी 24 तास कार्यकर्त्ये धडपडताना दिसतं होते. तेही मतदानाच्या दुसर्‍या दिवसापर्यंत.

कोल्हापूर शहरातील दोन्ही उमेदवारांनी(corporater) मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विशेष वाहनाची सोय केली होती. महाविकास आघाडीकडून फुलपाखरू तर महायुतीकडून जास्वाद या फुलांची स्टिकर रिक्षावार लावण्यात आली होती. त्याची संपूर्ण यंत्रणा माजी नगरसेवक यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. आपापल्या बूथवरील मतदानावरून त्यांची महापालिका निवडणुकीतील भविष्यातील गणिते धरूनच माजी नगरसेवक आणि इच्छुक दिवसभर सक्रिय दिसत होते. शिवाय लावलेली फिल्‍डिंग यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक स्वतः बूथवर दिवसभर थांबून होते.

सध्या कोल्हापूर महापालिकेवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज आहे. चार वर्ष महानगरपालिकेसाठी निवडणूक झाली नाही. अशातच यंदा लागेल पुढच्या वर्षी लागेल असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी आपले कामं सुरु ठेवले आहे. मात्र निवडणूक लागत नसल्याने आणि पैसा खर्च होत असल्याने अनेकांनी कामं थांबवले होते. मात्र पुढील काही महिन्यात महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे माजी नगरसेवकांना मतदारांसमोर जाण्याची हिच संधी शोधून इच्छुकांनी आपली तयारी सुरु केली आहे. निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमुळे दोन-तीन राजकीय पक्ष एकत्रित आले आहेत. यानिमित्ताने भागात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी माजी नगरसेवकांनी साधली आहे. मात्र जो इच्छुक जास्त लीड देईल त्यालाच प्रसाद मिळणार हे नक्की आहे.

हेही वाचा :

मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रंचड नाराज

‘या’ अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी

निकालाआधीच लागले विजयाचे बॅनर; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा…