गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे हेड कोच, जय शहा यांनी केली घोषणा

मुंबई, 9 जुलै 2024: टीम इंडियाचा (team india) माजी सलामीवीर खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर आता राहुल द्रविडचा वारसा पुढे चालवणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याची घोषणा केली आहे.

गौतम गंभीरच्या (team indiateam india) या नव्या भूमिकेबद्दल जय शहा म्हणाले, “मला अत्यंत आनंद होत आहे की, गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये दमछाक सहन करून आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे, मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे.”

गौतम गंभीर याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. अशातच आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनासाठी टीम इंडिया आगामी स्पर्धेत भाग घेईल. या नियुक्तीने भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन पर्व सुरू होणार आहे.

हेही वाचा :

कठुआ अतिरेकी हल्ल्यातील शहीद जवानांचे पार्थिव देहराडूनला पोहोचले

540 कोटींच्या घोटाळ्यात IAS राणू साहू अडकल्या..

एलपीजी गॅस धारकांसाठी केंद्रीय मंत्री पुरी यांची मोठी घोषणा