गौतम गंभीर यांनी महेंद्र सिंग धोनीच्या कर्णधार पदावर केले मोठे व्यक्तव्य

मुंबई: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा माजी भारतीय खेळाडू(dream11 dhoni) गौतम गंभीर लवकरच हाती घेणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. भारतीय संघ सध्या टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळत आहे. सध्या भारतीय संघाची प्रशिक्षकपदाची धुरा माजी भारतीय खेळाडू राहुल द्रविड यांच्या हाती आहे. लवकरच द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. गौतम गंभीर यांनी प्रशिक्षकपदावरून महेंद्र सिंग धोनीबद्दल सध्या आपले मत मांडले आहे.

भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ २०२४च्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत असणार आहे. बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात बऱ्याच काळापासून आहे. गौतम गंभीर भारताचा पुढील मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

नुकतेच एका मुलाखतीत गौतम यांनी कोणत्या कर्णधाराच्या(dream11 dhoni) नेतृत्वात खेळायला आवडेल यावर म्हटले आहे की, “खरंतर हा एक वादग्रस्त प्रश्न आहे, मला प्रामाणिकपणे न्यूज वाल्याना हेडलाईन द्याची नाही आहे, प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता होती, मी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.”

“मी अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम कामगिरी केली आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली माझा चांगला काळ होता, सर्वाधिक काळ मी एमएसच्या कर्णधारपदाखाली खेळलो, मला धोनीसोबत खेळल्याचा आणि त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्याचाही मला आनंद आहे.” गौतम म्हणाले.

गौतम गंभीरने २००४ ते २०१६ दरम्यान भारताकडून ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी- २० सामने खेळले आहेत. गंभीरने कसोटीत ४१५४ धावा, वनडेत ५२३८ धावा आणि टी-२० मध्ये ९३२ धावा केल्या आहेत तर कसोटीत ९ शतके आणि एकदिवसीय सामन्यात ११ शतके झळकावली आहेत.

लवकरच गौतम भारताची प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. गौतम यांनी बीसीसीआयकडे काही अटी ठेवल्या आहेत ज्यात प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा संघ असणार सपोर्ट स्टाफ मधील काही मेमेंबर्स चेंज होणार फलंदाज आणि गोलंदाज प्रशिक्षकातही बदल होऊ शकतो अश्या बातम्या समोर आल्या आहेत.

गौतम हा पहिला प्रशिक्षक ठरणार आहे ज्यांना स्पोर्ट स्टाफ स्वतः निवडण्याचा अधिकार मिळाला आहे. सध्या गौतम हे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे लवकरच देशाची ड्युटी संभाळण्यासाठी सज्ज होणार आहे.

हेही वाचा :

धावत्या कारमध्ये स्विमिंग पूल बनवणे पडले महागात!

पेपर लीक करणाऱ्यांना जबर दंडाचा फटका 10 वर्षांचा कारावास ते 1 कोटींचा दंड..

मराठ्यांना खुशाल आरक्षण द्या, पण त्यांच्या जमिनी अन् कारखाने आमच्या नावावर करा; ओबीसी बांधव खवळले