नवीन वर्षात अनेक जण नववर्षाचे संकल्प करत असतात. कोणी जिम लावायचे संकल्प करते तर कोणी मद्यपान सोडण्याचा संकल्प करतात. पण यापलीकडे जर तुमच्याकडे स्वतःची कार(car) असेल तर त्याची यावर्षी नीट देखभाल करण्याचा संकल्प तुम्ही करावा, हेच आम्ही सांगू इच्छितो.

काही जणांसाठी स्वतःची कार(car)म्हणजे जीव की प्राण असतो. कारला एक जरी स्क्रॅच किंवा डेंट आला की त्यांचा जीव वर खाली होत असतो. आता नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि जर तुम्ही तुमची कार सर्व्हिस केली नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही कारच्या चेकअपबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या कारमध्ये या चेकअप करून घेतल्या, तर खात्री बाळगा की तुमची कार वर्षभर सुसाट धावेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कारची तपासणी करून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. चला या कारच्या चेकअप्सबद्दल जाणून घेऊया.
टायरचा प्रेशर आणि कंडिशन:
हे महत्त्वाचे का आहे: योग्य टायर प्रेशर कारचे मायलेज वाढवते आणि ब्रेकिंग देखील सुधारते. कमी किंवा जास्त दाबामुळे टायर लवकर खराब होऊ शकतात. म्हणूनच महिन्यातून एकदा टायरचा दाब तपासा. टायरमध्ये तडे किंवा नुकसान तर नाही ना हे देखील वेळेवर तपासणे गरजेचे आहे.
ब्रेक:
हे महत्त्वाचे का आहे: ब्रेक हा कारचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खराब ब्रेकमुळे तुमचा जीवही जाऊ शकतो.
म्हणूनच नेहमी कारचे ब्रेक पॅड, डिस्क आणि ब्रेक ऑइल तपासा. तसेच ब्रेक लावताना काही आवाज येतो का ते याकडे सुद्धा लक्ष द्या.
इंजिन ऑइल आणि फिल्टर:
हे महत्त्वाचे का आहे: इंजिन ऑइल इंजिन थंड ठेवण्यास आणि घर्षण कमी करण्यास मदत करते. खराब इंजिन ऑइलमुळे इंजिन खराब होऊ शकते व याचा वाट परिणाम कारवर होऊ शकतो. यासाठीच इंजिन ऑइल आणि ऑइल फिल्टर वेळोवेळी बदला. तसेच इंजिन ऑइलचा चांगला असावा.
वायपर आणि वॉशर फ्लुइड:
हे का महत्त्वाचे आहे: पाऊस किंवा धुक्यात स्पष्ट दृष्टी येण्यासाठी वायपर आणि वॉशर फ्लुइडचे योग्य कार्य करणे आवश्यक आहे. कारचे वायपर ब्लेड तपासा आणि खराब झाल्यास ते बदला. वॉशर फ्लुइडची पातळी देखील तपासा.
बॅटरी
हे महत्त्वाचे का आहे: कार सुरू करण्यासाठी बॅटरी आवश्यक आहे. खराब बॅटरीमुळे कार सुरू होणार नाही.
यासाठी बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ करा आणि बॅटरीची स्थिती नेहमी तपासात चला.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
एसी फिल्टर: वेळोवेळी एसी फिल्टर बदलत राहा.
लाइट्स: सर्व लाइट्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे देखील तपासा.
टायमिंग बेल्ट: वेळोवेळी टायमिंग बेल्ट बदलत राहा.
पॉवर स्टेअरिंग: पॉवर स्टेअरिंग योग्यरित्या काम करत आहे की नाही हे देखील तपासा.
हेही वाचा :
‘या’ कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका
क्रिकेटर शिखर धवनचे ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचे स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल
डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ