आजघडीला अनेकजण रक्तदाब, मधुमेह, ताणतणाव(healthy) यांसारख्या आजारांना बळी पडत आहेत. परंतु, आहे त्यात समाधान मानून, स्वतःसाठी रोज 45 मिनिटे व्यायामाला आणि पंधरा मिनिटे धारणा, ध्यानासाठी द्या. माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
मागील पिढीत लोक अगदी शंभर वर्षांपर्यंत निरोगी(healthy) आयुष्य जगायचे. हल्ली मात्र अनेक जण तारुण्यातच अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याचे दिसून येते. रक्तदाब, मधुमेह, ताण-तणाव, हृदयविकार आदी विकार तर सर्वसामान्य झाले आहेत.
यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आहे. सध्या माणसाच्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळादेखील निश्चित नाही. त्यात फास्टफूडचे वाढलेले सेवन अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीत माणसाने स्वतःला हवे तसे बदल केल्यानेच अनेक आजारांना माणूस स्वतः निमंत्रण देत आहे. या जीवनशैलीत बदल केल्यास माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
काय करावे?
रोज 45 मिनिटे योगा, व्यायाम करावा.
किमान 15 मिनिटे ध्यान करावे.
सकस आहार घ्यावा.
जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात.
ताण-तणावापासून दूर राहावे.
वेळेवर झोपावे.
जास्तीची अपेक्षा करण्यापेक्षा आहे त्यात समाधानी राहा.
चाळिशीनंतर या चाचण्या कराव्यात
वयाच्या चाळिशीनंतर वर्षांतून किमान दोनवेळा मधुमेह, थायरॉइड, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट, व्हिटॅमिन डी-३, व्हिटॅमिन बी-१२, २ डी इको, स्ट्रेस टेस्ट या चाचण्या करून घ्याव्यात.
निरोगी आयुष्यासाठी रोज व्यायाम, योगा, धारणा, ध्यान, सकस आहार, वेळेवर झोप हे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आहे त्यात समाधानी राहावे. वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून किमान दोनदा स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी.
हेही वाचा :
हिटमॅन ऑन ‘डॉटर ड्यूटी’, लाडक्या लेकीसाठी रोहित शर्माने असं काही केलं की…
ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या भावात दररोज बदल
अल्लू अर्जुनचा एकदम जबरा लूक; ‘पुष्पा २’चे नवीन पोस्टर लॉन्च