तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कित्येक तरुणांची नेव्हीमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. मात्र आता हेच स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी(candidate) एक सुवर्णसंधी आहे. नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल (DAS), विशाखापट्टणम, संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत, 2025-26 साठी शिकाऊ प्रशिक्षणासाठी नेव्ही अप्रेंटिस भरती जाहीर झाली आहे.
या भरतीद्वारे विविध ट्रेडमध्ये एकूण 275 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मात्र यासाठी मान्यताप्राप्त संस्थांमधून ITI पूर्ण केलेला असावा. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छूक उमेदवारांनी(candidate) लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया सुरु करावी.
भरती संबंधित संपूर्ण माहिती :
विभागाचे नाव : भारतीय नौदल
पदाचे नाव : नेव्ही अप्रेंटिस भरती
एकूण पदे: 275
शैक्षणिक पात्रता : ITI पास
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 14 वर्षे ते 18 वर्ष असावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट: अधिक माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे; भाजप नेत्यांकडून होतेय मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केंद्राकडून ३,२९५ कोटींच्या ४० प्रकल्पांना मंजुरी
रेश्मा शिंदे करतेय ‘आयुष्याची नवी सुरुवात’; अखेर दिसला वरचा चेहरा लग्न सभारंभाचे फोटो व्हायरल!