क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या(nba playoffs) सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत केवळ कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला आहे. तर पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे उर्वरीत ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे, की १४ गुण असलेला संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो.

फाफ डू प्लेसिसला (nba playoffs) या हंगामात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. ३ मे पर्यंत हा संघ १ सामना जिंकून गुणतालिकेत दहाव्या स्थानी होता. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाणारा पहिला संघ ठरेल असं म्हटलं जात होतं. मात्र आता या संघाला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

हा संघ सध्या पाचव्या स्थानी असून शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र दोन्ही संघांना हा सामना जिंकूनही इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान असं एक समीकरण समोर आलं आहे, ज्यात दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते.

या दोन्ही संघांची या हंगामातील कामगिरी पाहिली, तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने देखील १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र चेन्नईचा संघ पराभूत होऊनही आपयीएलच्या प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.

इथे पाहा समीकरण
१. सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभव झाला पाहिजे.

२. लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा विजय झाला पाहिजे

३. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाचा दारुण पराभव झाला पाहिजे.( नेट रनरेट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघापेक्षा कमी असायला हवा)

४. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध विजय झाला पाहिजे.

हेही वाचा :

मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो… Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच

दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले

कोल्हापुरमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या