मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट

बेंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार(mumbai indians) यादवला बुधवारी खेळण्यास मान्यता दिलीय. तीन महिन्यांहून अधिक काळ तो क्रिकेट खेळलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि एनसीएच्या फिजिओंना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. पूर्ण समाधानी झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला खेळण्याची परवानगी देण्यात आलीय.

बीसीसीआयच्या एका सूत्राने(mumbai indians) सांगितले की, सूर्यकुमार यादवची तीनदा फिटनेस चाचणी झाली. एनसीएने त्याला काही सराव सामने खेळायला लावले. त्या सराव सामन्यात तो उत्कृष्ट खेळत होता. यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होऊ शकतो. सूर्या जेव्हा एमआयमध्ये सामील होईल तेव्हा तो १०० टक्के तंदुरुस्त आणि सामने खेळण्यासाठी तयार असेल याची खात्री करायची होती असं एनसीएने सांगितले.

आयपीएलपूर्वीच्या पहिल्या फिटनेस चाचणीदरम्यान तो १००टक्के तंदुरुस्त वाटत नव्हता, त्यामुळे फलंदाजी करताना त्याला वेदना होतात की नाही हे पाहण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो, असंही एनसीएने सांगितले”.

दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला ग्रेड II च्या घोट्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी संघातून बाहेर राहिला . नंतर आणखी एक त्याला दुखापत झाली आणि त्याला हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले, ज्यामुळे तो आतापर्यंत मैदानापासून दूर होता.

दरम्यान सूर्यकुमार यादव आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा टी२० फलंदाज आहे. म्हणून त्याची उपलब्धता मुंबई इंडियन्ससाठी फायदेशीर ठरेल. मुंबईच्या संघाला सलग तीन पराभव स्वीकारावे लागलेत. तसेच नवा कर्णधार हार्दिक पांड्याला प्रत्येक सामन्यात चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

शुभमंगल सावधान! 10 वर्षांच्या डेटींगनंतर तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात

उद्धव ठाकरेंना मारलेला ‘तो’ टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला