सांगलीतील 80 गावे टंचाईग्रस्त, 73 टँकरने पाणीपुरवठा

सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र होत चालल्या असून, सध्या एशी गावे टंचाईग्रस्त आहेत.(supplying) 73 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, दीड लाखांवर लोकसंख्या बाधित झाली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील ही गावे असून, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्यांत 4 गावे टंचाईग्रस्त आहेत. मात्र, तेथे अद्यापि टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही.

पावसाळ्यात जुलै महिना वगळता जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यात कमी पाऊस झालेल्या जिह्यांमध्ये सांगलीचाही समावेश झाला. यंदा सरासरीच्या 68 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पावसाने मोठय़ा प्रमाणात ओढ दिल्याचा फटका जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना बसला आहे. तेथे नागरिकांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून 73 गावे आणि 529 वाडय़ांना 75 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने डिसेंबरमध्येच 41 गावांना टँकरने पाणीपुरवठा (supplying)सुरू होता. त्यावेळीच ऐन उन्हाळ्यात टंचाई तीव्र होणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे. पावसाळ्यासाठी अजून सुमारे तीन महिन्यांचा कालावधी जावा लागणार आहे. यादरम्यान टंचाईच्या झळा किती तीव्र होणार, याचीच भीती आहे.

जत तालुक्यातील 68 गावे टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी 65 गावांना तसेच 479 वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील 1 लाख 46 हजार 684 नागरिक टंचाईने बाधित झालेले आहेत. आटपाडी तालुक्यातील आठ गावे आणि 50 वाडय़ा टंचाईग्रस्त असून, त्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यातील 12 हजार 742 लोकसंख्या टंचाईने बाधित आहे. जत तालुक्यात 66, तर आटपाडी तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एक गाव टंचाईग्रस्त आहे.

टंचाईग्रस्त गावे : तालुका, गाव आणि टँकर

– जत निगडी खु. 1, शेडय़ाळ 1, सिदूर 2, पांढरेवाडी 2, वळसंग 1, एकुंडी 1, हाळळी 1, बसर्गी 1, सोन्याळ 2, सालेगीरी पाच्छापूर 1, कुडनुर 1, वायफळ 1, गुगवाड 1, गिरगाव 1, संख 2, जादरबोबलाद 1, कारजनगी 1, उमराणी 2, तिकोडी 2, बेळोडंगी 1, मोकाशेवाडी, टोणेवाडी 1, माडग्याळ 2, सोनलगी 1, मुचंडी 1, जालीहाळ खु., कागनारी, दरीबडची 1, कोलगिरी 1, को.बोबलाद, लमाणतांडा (द.ब.) 1, केरेवाडी (को.बो.) 1, व्हासपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोणूर 1, सिद्धनाथ 1, सुसलाद 1, पांडोझरी-1, सोरडी-1, खोजनवाडी-1, तिल्ल्याळ-1, गोंधळेवाडी-1, अंकलगी 1, मोटेवाडी आ.तू 1, भिवर्गी 1, मल्ल्याळ 1, माणिकनाळ 1.5, खिलारवाडी 1.25, वाशान 1, बनाली 1.25, लकडेवाडी 1, कुलालवाडी 1, जिरर्ग्याल 1, बालगाव 1, असंगी जत 2, लवंगा 0.5 कोणबगी 0.75 जालीहळ बु. 2, बेवनूर 2, कोनीकुनुर 1.5, असंगी तुर्क 1.75, बिळूर 2.

आटपाडी : बोंबेवाडी 1, आंबेवाडी 1, विठलापूर 1, पूजारवाडी 1, उंबरगाव 1, पिंपरी खु. 1, विभूतवाडी 1, पिंपरी बु. 1

हेही वाचा :

शुभमंगल सावधान! 10 वर्षांच्या डेटींगनंतर तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात

उद्धव ठाकरेंना मारलेला ‘तो’ टोमणा भोवला! संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला