महागाईमुळे त्रस्त लोकांसाठी आनंदाची बातमी; पेट्रोलच्या किंमतीत घट

फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस उद्या असल्याने आणि मार्च (Petrol price)2025 च्या सुरुवातीस नवीन आर्थिक नियम अंमलात येणार असल्याने, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. मात्र, वाढत्या महागाईमुळे त्रस्त लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे भारत पेट्रोलियमने आपल्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पेट्रोलच्या किंमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल किंमतीत घट
वाढत्या महागाईमुळे खाद्यतेल, भाजीपाला, डाळी-साळीपासून कपडेपर्यंत सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तसेच, गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या किंमतीही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खर्च नियंत्रित ठेवणे कठीण झाले आहे. याच परिस्थितीत, भारत पेट्रोलियमने खास ऑफर अंतर्गत पेट्रोलचे दर घटवून फक्त 75 रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेतला आहे, जे सध्या मुंबईत 103.50 रुपये प्रति (Petrol price)लिटर दर असलेल्या पेट्रोलच्या तुलनेत मोठी बचत ठरेल.

हे खास ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू आहे. या ऑफरच्या माध्यमातून मुख्यत्वे टू व्हीलर वापरणारे ग्राहक लाभान्वित होतील. कंपनीने आपल्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्तात पेट्रोल उपलब्ध करण्याचा उद्देश साधला आहे.

ऑफरच्या अटी व ग्राहकांना होणारा फायदा
भारत पेट्रोलियमने हा विशेष ऑफर फक्त अठरा वर्षांवरील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केला आहे. या ऑफरचा लाभ कंपनीचे कर्मचारी, डीलर्स, वितरक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार नाही. प्रत्येक मोबाईल नंबरवर एकदाच हा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षितता(Petrol price) सुनिश्चित केली जाते.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल नंबरसह स्थानिक पेट्रोल पंपावर नोंदणी करावी लागेल. यासह, MAK 4T इंजिन ऑइलचा किमान एक पॅक खरेदी केल्यावर एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो. इंजिन ऑइल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना त्वरित 75 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल उपलब्ध होईल आणि जर गरज भासल्यास मोफत इंजिन ऑइल बदलण्याची सोय देखील दिली जाईल.

हेही वाचा :

घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख

स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे

रेझर वापरल्याने होतील त्वचेच्या समस्या, तुमच्या त्वचेसाठी काय आहे धोका?