गुगल कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.(google)कंपनी आपल्या Google Pixel 8 सीरीजमधील सर्वात स्वस्त फोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे फिचर्स लीक झाले आहे. त्यामुळे या स्मार्टफोनबाबत माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनचे नाव Google Pixel 8a असेल.
गुगलचा हा नवीन स्मार्टफोन Tensor G3 प्रोसेसरसह येऊ शकतो.(google)या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट स्क्रिन दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन नवीन फिचरसह बाजारात लाँच होणार आहे.
Google Pixel 8a मध्ये Tensor G3 प्रोसेसर आणि ७ वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट दिले जाई शकते. मीडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येईल. हा स्मार्टफोन जवळपास Pixel 7a सारखाच असेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, Pixe 8a हा A-सीरीजमधील आतापर्यंतचा सर्वात चांगला स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन IP67 रेटिंगसह येईल. हा स्मार्टफोन Pixel 8 सीरीजप्रमाणेच असेल. कंपनी हा स्मार्टफोन ब्लू आणि ग्रीन या रंगामध्ये लाँच करु शकते.
या स्मार्टफोनच्या प्रमोशनल ऑफरअंतर्गत कंपनी या फोनसोबत 6 महिन्यांचे Fitbit Premium सबस्क्रिप्शन देऊ शकते. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग, 30W वायर्ड चार्जिंग आणि USB TYPE-C फीचप असू शकते. हा स्मार्टउोम हँडसेट बेस्ट टेक, ऑडि मॉजिक इरेजर, नाईट साइट आणि मॅजिक इरेजर कॅमेरा मोडसह येईल.
गुगलने या फोनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी हा स्मार्टउोम १४ मे रोज लाँच करु शकते. कंपनी GOOGLE I/O इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करु शकते. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार?
मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला…
कोल्हापूर, हातकणंगलेत अंडरकरंटचा झटका? 30 दिवसाच्या मेहनतीवर दीड दिवसांत पाणी