सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा. तसेच बँकेवर(district) प्रशासक नेमा यासह अनेक प्रमुख मागण्यांसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चाबूक मोर्चा काढला आहे. स्टेशन चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून, मोर्चाचा शेवट हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर होणार आहे.
आमदार गोपीचंद पडळकर व माजी राज्यमंत्री(district) सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली या चाबूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. जिल्हा बँकेतील गैरकारभार करणाऱ्यांना जयंत पाटील पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँकेत झालेल्या गैरकारभाराचा जयंत पाटील हेच म्होरक्या असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.
तसेच बँकेकडून आता 400 पदाची नोकरभरती करण्याचा प्लॅन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संचालकाकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मागच्या नोकर भरतीमध्ये संचालकांच्या जवळचे पण बँकेत काम करण्यासाठी पात्र नसणारे उमेदवार नेमणूक झाल्याचा आरोप देखील पडळकरांनी केला आहे.
चाबूक मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय?
बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे.
बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे.
बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहेत याची चौकशी व्हावी.
नवीन भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येऊ नये.
बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करून गुन्हे दाखल करावेत.
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी.
हेही वाचा :
शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण ?
शाळेच्या वर्गातच चक्कर येऊन बेंचवरून पडून सहावीतील मुलीचा मृत्यू
कोल्हापूर : पाकिटातील नाव बदललं अन् सभापतिपद हुकलं; वडिलांची कसर काढली मुलाने भरून