कोल्हापूर : पाकिटातील नाव बदललं अन्‌ सभापतिपद हुकलं; वडिलांची कसर काढली मुलाने भरून

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीत १९९६-९७ मध्ये नेत्यांनी पाठवलेल्या(chairman chair) पाकिटातील पी. आर. देसाई यांचे नाव परस्पर बदलले. देसाई यांच्या नावाऐवजी दुसऱ्याच संचालकाच्या नावाची चिठ्ठी घातली. त्यावेळी देसाई यांचे हुकलेले सभापतिपद आज त्यांचे चिरंजीव ॲड. प्रकाश देसाई यांच्या रूपाने मिळाल्याची भावना बाजार समिती संचालकांनी व्यक्त केली, तर शेतकरी हितासाठीच बाजार समितीचा कारभार केला जाईल, अशी ग्वाही नतून सभापती ॲड. देसाई यांनी आज दिली. बाजार समिती सभापती निवडीनंतर सभापती आणि संचालकांनी मनोगत व्यक्त केले.

सभापती ॲड. देसाई म्हणाले, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदारांशी(chairman chair)संवाद साधू. कचऱ्यापासून वीज निर्मिती, रस्ते दुरुस्ती, शेतकरी निवास बांधण्याला प्राधान्य असेल. मावळते सभापती भारत पाटील म्हणाले, ‘गेल्या वर्षात बाजार समितीची मागील देणी पूर्ण करून समितीला अडीच कोटींचा फायदा केला आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी ठेवलेल्या विश्‍वासास पात्र ठरत काम केले.’

संचालक सूर्यकांत पाटील म्हणाले, ‘शेती उत्पन्न बाजार समितीत १९९६-९७ मध्ये नेत्यांनी पी. आर. देसाई यांचे नाव पाकिटातून दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पाकिटातील हे नाव बदलून दुसऱ्या संचालकाचे नाव यामध्ये घुसवले.

त्यामुळे अध्यक्ष निवडीपूर्वी पाकिटातून कोणाचे नाव आहे याचे वाचन झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. काल सभापतीच्या नावाचे पाकिट माझ्याकडे दिले होते. त्यामुळे रात्रभर झोप नव्हती. जे नेत्यांनी नाव दिले आहे त्याच संचालकांचे नाव असणार का?

याची धुगधूग होती.’ संचालक नंदकुमार वळंजू म्हणाले, ‘बाजार समितीमध्ये विरोधी पक्षनेता असलो तरीही चांगल्या कामाला पाठबळ दिले जाईल.’ यावेळी शिवाजी पाटील, शेखर देसाई, पांडुरंग काशिद, नानासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

ज्येष्ठांना अटक न करण्याची तरतूद फसवी की आश्वासक…..?

कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला

भाजपला धक्का! दोस्ती संपली आता फक्त दुश्मनी…