कोल्हापूरच्या राजघराण्या कडून माघारीचे “गुढ” राजकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील(politics) मधुरिमा राजे यांनी सोमवारी त्यांना काँग्रेस कडून मिळालेली अधिकृत उमेदवारी मागे घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात हलकल्लोळ उडून दिला. कोल्हापूर जिल्ह्याच्या निवडणुकीच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडल्यामुळे सर्वसामान्य माणूस चक्रावून गेला आहे. काँग्रेसला तसेच जिल्हाध्यक्ष असलेल्या सतेज पाटील यांना दरबारी झटका देण्यामागची नेमकी कारणे अद्यापही गुलदस्त्यात राहिल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याचे गुढ अधिकच वाढले आहे. मधुरिमा राजे यांच्या माघारीमुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस गायब झाली आहे.

सोमवारी दुपारी खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार(politics) युवराज मालोजीराजे छत्रपती आणि त्यांच्या पत्नी मधुरिमा राजे छत्रपती हे “राज कुटुंब” जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. ते निवडणूक अधिकारी कार्यालयात सक्षम अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रस्ताव सादर केला. तेव्हा क्षणभर अधिकारी सुद्धा गोंधळून गेले. राज कुटुंबाच्या पाठोपाठ सतीश पाटील आले पण त्यांना तसा उशीर झाला होता. .

कारण मधुरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. जे स्वप्नातही वाटले नव्हते ते प्रत्यक्षात घडल्याचे दिसताच सतेज पाटील हे संतप्त तर झालेच शिवाय मानसिक दृष्ट्या ते अस्वस्थ झाल्याचे दिसले. राजघराण्याकडून झालेला हा माझा विश्वासघात आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरिमा राजे यांनी निवडणूक रिंगण सोडण्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरतात जिल्ह्यात राजकीय हल्लकल्लोळ उडाला. कोल्हापूरच्या राजघराण्याकडून अशा प्रकारची कृती तीही अचानक पणे का करण्यात आली याची अंदाजीत कारणे पुढे येत असली तरी या माघारीचे गूढ अधिकच वाढले आहे.

मधुरिमाराजे मालोजी राजे छत्रपती यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी कोणीही राजकीय दबाव आणलेला नव्हता. राजेश लाटकर यांची उमेदवारी काँग्रेसने ऐनवेळी रद्द करून त्यांच्या जागी मधुरिमा राजे यांना तिकीट दिले होते. राजेश लाटकर नको असतील तर मधुरिमा राजे यांनाच तिकीट दिले पाहिजे यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. तो मान्य ही झाला होता. विशेष म्हणजे विद्यमान खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज मालोजी राजे छत्रपती यांच्याशी चर्चा करून मधुरिमा राजे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी सतेज पाटील यांना विश्वासात न घेता राजघराण्यातील उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन सर्वांनाच जोरदार धक्का दिला. कोल्हापूरच्या जनतेलाही त्यांनी चकित करून सोडले. त्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी असे कोणतेही कारण नव्हते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, मधुरिमा राजे यांनी निवडणुकीचे मैदान सोडावे यासाठी राजवाड्यातूनच त्यांच्यावर दबाव होता. खासदार शाहू छत्रपती यांनीही”नाईलाजाने आम्ही हा माघारीचा निर्णय घेतला”असे मीडिया समोर सांगितले मात्र नेमके कारण सांगितले नाही.

राजा घराण्याच्या या निर्णयाचा सर्वात मोठा धक्का सतेज पाटील(politics) यांना तसेच काँग्रेसलाही बसला. माझा आणि काँग्रेसचा तुम्ही विश्वासघात केला आहात. मला हा तुमचा निर्णय अजिबात पटलेला नाही. अशा शब्दात सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यासमोर आपला संताप व्यक्त केला.

विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही अशी चमत्कारिक परिस्थिती केवळ राजघराण्याच्या अवसान घातकी निर्णयामुळे निर्माण झाली आहे असे म्हणावे लागेल.
वास्तविक मधुरिमा राजे यांनी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह काँग्रेस नेत्यांनी केलेला नव्हता.

राजेश लाटकर हा उमेदवार आम्हाला नको म्हणून काँग्रेसच्या 27 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी उठाव केला होता. आणि म्हणूनच लाटकर यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली होती. त्यानंतर मधुरिमा राजे यांचे नाव निश्चित करण्यात आले. शक्ती प्रदर्शन करून मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणि सोमवारी अगदी अचानक उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसला केवळ धक्काच दिला नाही तर काँग्रेसवर आणि नेत्यांवर त्यांच्या या निर्णयामुळे नामुष्की आली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात यापूर्वी पक्षीय पातळीवर असे कधीही घडलेले नव्हते. असे नेमके काय घडले की उमेदवारी मागे घेण्याची पाळी यावी याची चर्चा सुरू झाली असून या माघारीचे गुढ वाढले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात सारे काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही अशी परिस्थिती या माघारीमुळे पुढे आली आहे.

सतेज पाटील हे काँग्रेसचे (politics)जिल्हा अध्यक्ष असले तरी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात तसेच महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट होती. पण ही परिस्थिती सतेज पाटील यांनी बदलून टाकली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला जेवढ्या जागा आलेले आहेत त्या सर्व जागा जिंकण्याचा त्यांनी निर्धार केला होता. पण अचानक मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. असे काही घडेल असे सतेज पाटील यांच्या स्वप्नातही नव्हते.

प्रत्यक्षात मात्र तसे घडल्यानंतर त्यांना बसलेला मानसिक धक्का त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. छत्रपती घराण्याच्या या निर्णयावर ते भलतेच संतप्त झाले होते आणि ते स्वाभाविकही होते. कोल्हापूरच्या जनतेने छत्रपती घराण्यावर प्रेम केले आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना विजयी करून इथल्या जनतेने ते सिद्धही केले आहे आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार का घेतली याचे कारण जाणून घेण्याचा अधिकार कोल्हापूरच्या जनतेला आहे. आणि तो मान्य करून नेमके कारण सांगितले गेले पाहिजे.

हेही वाचा :

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक मैदान सोडले…!

आई-मावशीच्या रीलच्या वेडापायी गेला चिमुकलीचा जीव; ती बुडत होती, त्या मात्र….

“…घरात ‘लक्ष्मी’ आली”; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News