गुकेशची विजयासह जेतेपदाकडे कूच

हिंदुस्थानच्या 17 वर्षीय डी. गुकेशने पँडिडेट्स(chess) बुद्धिबळ स्पर्धेतील चूरशीच्या 13 व्या फेरीत फ्रान्सचा अव्वल खेळाडू फिरोउझा अलिझेरा याच्यावर विजय मिळवित जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. आता 14 व्या व अखेरच्या फेरीत त्याची गाठ अमेरिकेच्या हिकारू नाकामुराशी पडणार आहे. आता गुकेशला या स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरून इतिहास रचण्याची नामी संधी आहे.

गुकेशने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार खेळ(chess) दाखवला आहे. दरम्यान, 13 व्या फेरीत फिरोउझाविरुद्ध गुकेशने पांढर्या मोहर्यासह डावाचा प्रारंभ केला. 63 चालीपर्यंत रंगलेल्या या अतिशय रोमहर्षक लढतीत अखेर गुकेशने बाजी मारली. या विजयास त्याने स्पर्धेत साडेआठ गुणांची कमाई करीत एकेरी आघाडी घेण्यात यश मिळविले. गुकेशने या पँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले, तर जगज्जेतेपदाच्या लढतीत त्याची गाठ चीनच्या डिंग लिरेन याच्याशी पडेल.

सध्या नाकामुरा रशियाचा इयान नेपोम्नियाची आणि फॅबिआनो पॅरुआना आठ गुणांसह संयुक्तपणे दुसऱया क्रमांकावर आहे. हिंदुस्थानचा आर. प्रज्ञानंद व विदित गुजराती संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत. पॅरुआनाने चुरशीच्या लढतीत प्रज्ञानंदला पराभूत केले, तर गुजरातीने अझरबैझानच्या अबासोवविरुद्धची लढत बरोबरीत सोडविली.

हेही वाचा :

सफाईचे कंत्राट देण्यास महापालिकेचा नकार; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र

जनतेनेच धडा शिकवावा! ; पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारवर शरद पवार यांची टीका

बर्ड फ्लूने टेन्शन वाढवले; केरळात बदकांना लागण दक्षिणेतील राज्यांत