विदर्भात गारपीट तर, राज्याच्या ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

राज्याच्या (state)कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी… पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.


महाराष्ट्रात(state) मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं चढ उतार होत असून, या बदलांचे थेट परिणाम नागरिकांवरही होताना दिसत आहेत. कोकण आणि नजीकच्या भागांमध्ये झालेला पाऊस आणि त्यानंतर असणारं ढगाळ वातावरण पाहता मुंबईपर्यंत याचे परिणाम दिसून आले. तर, विदर्भात उष्णतेची लाट येऊनही पावसाच्या सरींनी मात्र निरोप घेतला नसल्याचच आता स्पष्ट झालं आहे. हवामान विभागानं ही प्रणाली पाहता राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही वादळी पाऊस आणि गारपीटीचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, नागपूर, यवतमाळमध्ये गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सध्या मराठवाडा ते विदर्भ पट्ट्यामध्ये चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, छत्तीसगढपासून केरळच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हे परिणाम दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमान 40 अंशांच्या घरात असून, काही भागांमध्ये 4 अंशांची वाढ नोंदवली जात


तापमान सेल्सिअस अंशांमध्ये
पुणे- 37.8 अंश
सातारा – 38.7 अंश
कोल्हापूर- 37 अंश
नाशिक – 36 अंश
रत्नागिरी – 34.5 अंश
अमरावती – 41.4 अंश
नागपूर – 40.1 अंश
वाशिम, अकोला, गडचिरोली – 42 अंश

हेही वाचा :

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?.

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल