मुंबई : महाविकास आघाडीमधील नाराजी याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये(current political news) सुरु आहे. महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस, शरद पवार व ठाकरे गटाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी आघाडीमध्ये नाराजी असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केल्यामुळे इतर मित्रपक्षांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच देशपातळीवरील आघाडीबाबत देखील खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा(current political news) दारुण पराभव झाला. यामुळे आता नेत्यांनी मनातील खदखद व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असे वक्तव्य केले आहे. तसेच काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, अशी टीका केली. अमोल कोल्हेंना उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “बचेंगे तो लडेंगे ही शिवसेवेचीच भूमिका आहे, आम्ही सोडून नाही गेलो दुसरीकडे. आम्ही लढतोय आणि लढत राहू,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
त्याचबरोबर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार विधानसभा निवडणुकीमधील पराभवाला जागावाटपामध्ये झालेला घोळ कारणीभूत असल्याची टीका केली आहे. तसेच काही नेते मुद्दाम उशीर करत असल्याची गंभीर टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “जागावाटपाची प्रक्रिया उगाच लाबंवली, हे आमचं सर्वांचं मत आहे. ती का लाबंली हे वडेट्टीवारांना माहिती असावं. महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होत. वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे. होय, चुका झाल्या पण आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेसला सर्वात जास्त जागा हव्या होत्या, आणि त्यांच्या सर्वात कमी आल्यात. विदर्भात वडेट्टीवारांनी काही जागा सोडल्या असत्या, ज्या ते हरलेत तर चित्र काहीसं वेगळ असतं. किशोर जोरगेवारांबाबत आमचं स्पष्ट मत होत, पण तसं झालं नाही, राष्ट्रवादीला ती जागा मिळाली नाही आणि जोरगेवर भाजपात गेले. याला सगळेच जवाबदार आहेत. कोल्हापूर उत्तर आम्ही मागत होतो, अशा अनेक जागा आहेत. पण कोणाला तरी राज्यात सर्वाधिक जागा लढनू मुख्यमंत्रीपद हवं होतं,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीबाबत सूचक वक्तव्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीचीही बैठक व्हायला हवी होती, जी झाली नाही. याचा फटका सर्वांनाच बसला. इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती, पण प्रत्येकजण आपलंच घोडं दामटवत राहिला. आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती, तो सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पण त्यांना ते जमलेलं नाही. इंडिया आघाडी विसर्जित करणं हे फार मोठं विधान होईल,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
हेही वाचा :
मविआत जुंपली, राऊतांनीही काडी टाकली, म्हणाले, “काँग्रेसनेच १७ दिवस घोळ..”
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चहलचा या आरजेसोबतचा फोटो व्हायरल, चाहते झाले चकित!
महाविकास आघाडीमध्ये वार पलटवार; ‘ती’ टीका लागली कॉंग्रेसच्या जिव्हारी, वडेट्टीवारांनी दिले प्रत्युत्तर