पौगंडावस्था किंवा ‘टीनएज’ हा वयाचा अत्यंत निर्णायक टप्पा असतो. हे वय म्हणजे एखाद्या कळीचं पोषक (nutrients)फुलात रूपांतर होत असतानाचा कालखंड.या कळीला जर पोषक वातावरण मिळालं, तर तिचं रूपांतर एका छान फुलात होऊ शकतं. मात्र, काही गडबड झाली, तर या कळ्या कोमेजूनही जाऊ शकतात.
त्यामुळेच या वयात मुलांना पोषक वातावरण निर्माण करून देणं, (nutrients)त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरं देणं हे पालकांसमोरचं मोठं आव्हान असतं. पौगंडावस्थेतील मुलांची मानसिकता समजावून घेण्यासाठी आणि त्यांना मैत्रीपूर्ण संवादातून मार्गदर्शन करण्यासाठी ‘टीनेज डॉट कॉम #१’ हे डॉ. वैशाली देशमुख लिखित पुस्तक पालकांना आणि शिक्षकांना उपयुक्त ठरू शकणार आहे. त्याचप्रमाणे टीनएजमधील मुलांशीही हे पुस्तक त्यांच्या अगदी जवळच्या मित्राप्रमाणे हितगूज करतं.
या वयात मुलांना अनेक प्रश्न भेडसावतात. त्या प्रश्नांची उत्तरं अगदी समर्पक आणि नेमक्या शब्दांत देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही उत्तरं उपदेशात्मक पद्धतीने आणि एखाद्या तात्त्विक विवेचनासारखी क्लिष्ट नसून आपल्याच अगदी जवळच्या व्यक्तीने आपल्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात अशा संवादात्मक पद्धतीने देण्यात आली आहेत.
बाह्यजगाबरोबर बदलणारी मनोवस्था आणि शरीरात होणारे बदल हेदेखील या वयात मुला-मुलींना कधी-कधी अस्वस्थ करतात. मात्र, बऱ्याचदा याबद्दल फारसं कुठे बोललं जात नाही किंवा त्याकडे आवश्यक तितकं लक्ष दिलं जात नाही. यातून मुलांमध्ये न्यूनगंडाची किंवा अपराधीपणाची भावनादेखील निर्माण होऊ शकते. त्यामुळेच या विषयांवरही अगदी शास्त्रीय पद्धतीने, पण सोप्या शब्दांत या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.
वयात येणाऱ्या मुला-मुलींचं वर्तन समजून घेऊन पालकांनी कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद द्यायला हवा? यावरही लेखिकेने प्रकाश टाकला आहे, पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याशी आत्मीयतेने आणि दिलखुलासपणे संवाद साधण्याची शैली कशी असावी? याचं प्रत्यक्ष उदाहरणदेखील या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर ठेवलं आहे.
त्याशिवाय विविध आकृत्या, तक्ते आणि छानशा व्यंग्यचित्रांचा व रेखाचित्रांचा समावेशही या पुस्तकात करण्यात आला आहे. केवळ मुला-मुलींनाच नव्हे, तर पालकांना आणि शिक्षकांनादेखील उपयुक्त ठरणारं हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.
हेही वाचा :
प्रकाश आवाडे यांचं औट घटकेचं आव्हान…!
X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार