बापासारखं खासदार व्हावसं वाटतं, ही माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

शिवसेनेनं ( ठाकरे गट ) चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर(father) केल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला. माजी मंत्री, विश्वजित कदमआणि विशाल पाटील यांनी काँग्रेसला जागा सुटावी यासाठी प्रयत्न केले. पण, अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडेच राहिली. त्यामुळे अखेर विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. यानंतर मंगळवारी झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले.

विशाल पाटील म्हणाले, “वसंतदादा घराण्याचं काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे. 1917 साली वसंतदादाचा जन्म(father) झाला. 1919 साली वसंतदादांचे छत्र हरपलं. लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला, तरूणपणात वसंतदादांना काँग्रेस सापडली. त्या काँग्रेसनं वसंतदादांना घडवलं. वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवलं आहे.”

“1999 पासून मी काँग्रेसचं काम करत आहे. माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिलं आहे. प्रत्येक घरातील पोराला आपल्या बापासारखं झालं पाहिजे, असं वाटतं. तसे मलाही वाटतं. वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? आजोबा आणि वडिलांसारखं झालो, तर ती माझी चूक आहे का? मी स्वार्थासाठी लढत नाही,” असं म्हणताना विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले.

“2002 साली मला जिल्हापरिषदेवर जायचं होतं, पक्षातील वरिष्ठांनी घराणेशाही होईल सांगितलं, मी थांबलो. 2005 साली वडिलांचं निधन झाल्यानंतर मी उभारलं पाहिजे, असं वाटत होते. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मी तक्रार केली नाही. लोक म्हणाली थांबा आणि कामाला लागा… तेव्हा मी सगळ्यात पुढे पळत होतो. जेव्हा, जेव्हा काँग्रेसनं थांबा म्हटलं, तेव्हा मी थांबलो,” अशी खंत पाटलांनी व्यक्त केली.

“2019 साली सगळे म्हणत होते, मी उभारलं पाहिजे, तेव्हा पक्षानं जागाच सोडून दिली. मला दुसऱ्या पक्षातून उभे राहायला सांगितलं. पक्षावर एकतर्फी प्रेम असल्यानं मी सुद्धा दुसऱ्या चिन्हावर लढतो. पण, पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो,” असं विशाल पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा :

विशाल पाटलांंचा आघाडीला अल्टिमेटम; उद्धव ठाकरे म्हणतात, “गद्दारी रोखावी…”

कोल्हापुरात खळबळ; महायुतीची साथ सोडताच ए. वाय. पाटलांवर गुन्हा दाखल

काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन; विशाल पाटील यांचं वक्तव्य