“इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं”; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोल्हापूरची(political news today) जागा सर्वाधिक चर्चेच आहे. येथून शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपति शाहू महाराज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोल्हापूरचा तांबडा पांढरा भारी…कोल्हापूरच राजकारण देखील भारी…येथील राजकारण कुस्तीसारखं आहे. येथे कोण जिंकणार यापेक्षा कोण कुणाला पाडणार, हा महत्वाचा मुद्दा आहे.

कोल्हापूरात कोणाला विजयी करायचे यापेक्षा कोणाला पाडायचे(political news today) हे आगोदर ठरवले जाते. 1999 पासून आजपर्यंत याच विचारातून मतदान झाल्यामुळे आणि हाच ट्रेंड कायम राहिल्यामुळे येथून कायम धक्कादायक निकाल पाहायला मिळतात. 2014 मध्ये मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादीचा खासदार विजयी झाला. कारण लोकांना त्यावेळी संजय मंडलिकांना धडा शिकवायचा होता.

दुसरीकडे 2019 मध्येही आपल्याला धक्कादायक निकालच पाहायला मिळाला. कारण पक्ष आणि कार्यकर्त्याशी नाळ तुटल्याने त्यांच्या विरोधात संताप होता. ते पक्षाच्या विरोधात काम करायचे आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्यात आणि सजेत पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता, असे सांगितले.

“इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं”; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

यावेळी राज्यभर चर्चेचा विषय असणाऱ्या महाडिक-पाटील संघर्षावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आला प्रचंड राजकीय वैर निर्माण झाले आहे. कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी महाडिकांना बिनशर्त पाठिंबा देत आपल रसद पुरवली. व त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, पुढे विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून धनंजय महाडिक यांच्या चूलत बंधू अमल महाडिक यांनी परभव केला.

लोकसभेला मदत करुनही विधानसभेत महाडिकांनी आपला पराभव केल्याची सल सतेज पाटील यांना आजही आहे. आणि म्हणून 2014 पासून कोल्हापूरातील कोणतीही निवडणूक असो त्यामध्ये महाडिक-पाटील आमने-सामने असतात. त्यामुळे यंदाही प्रतिस्पर्धी शाहू महाराज आणि संजय मंडलिक असले तरी, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचीच प्रतिष्ठा पणाला लागले आहे, असे स्पष्ट केले.

हेही वाचा :

“पोलिसांनो! जे करायचं ते करा”; राजू शेट्टी भडकले

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का

कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले…