हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर.. अश्विनच्या व्हिडिओमुळे सुरु झाला मोठा वाद

नवी दिल्ली : रवीचंद्रन अश्विनच्या (cricketer)एका व्हिडिओमुळे आता एक नवीन वाद पेटला आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर… असं म्हणत अश्विनने नवा वाद सुरु केला आहे. अश्विनचा हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे.

अश्विनला(cricketer) भारतीय संघात मानसीक त्रास दिला जात होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले होती. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात अचानक निवृत्ती घेतली होती. सि़डनीतील अखेरची कसोटी सुरु होण्यापूर्वीच अश्विनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर अश्विन ऑस्ट्रेलियात थांबलाच नाही तर तो थेट भारतात निघून आला होता. त्यानंतर अश्विन आज पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी त्याने हे विधान केले आहे.

या कार्यक्रमात घडलं असं की, अश्विन म्हणाला , ” इथे इंग्रजी कोणाला येतं, त्यावर काही मुलांनी आवाज केला. त्यानंतर अश्विन म्हणाला की, इथे तमिळ कोणाला येते. त्यावर बऱ्याच मुलांनी आवाज दिला. त्यानंतर अश्विन म्हणाला की, इथे हिंदी भाषा कोणाला येते. त्यावेळी कोणीही अश्विनला साद दिली नाही. त्यावेळी अश्विन म्हणाला की, ” हिंदी ही काही आपली राष्ट्रभाषा नाही, तर ती आपली अधिकृत भाषा आहे.” अश्विनचे हे विधान वादग्रस्त ठरले आहे.

कारण भारताची राष्ट्रभाषा कोणती, यावर बऱ्याच राज्यांमध्ये वाद सुरु आहेत, या वादात आता अश्विनने उडी घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद अजून चिघळू शकतो, असे दिसत आहे. कारण अश्विन भारतीय संघात होता, त्यावेळी तो हिंदीमध्येच संवाद साधत होता. पण आता मात्र त्याने असं का विधान केलं आहे, याचा थांग लागत नाही.

अश्विनने या कार्यक्रमात थेट राष्ट्रभाषेबाबत वक्तव्य केले आहे. दक्षिण भारतामध्ये हिंदी फारशी बोलली जात नाही, त्यामुले तिथे हे वक्तव्य चालून जाऊ शकतं. पण अश्विन जेव्हा उत्तरेतील भागांमध्ये येईल, तेव्हा त्याला वादाला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आता अश्विनच्या वक्तव्यानंतर पुन्हा वाद सुरु होतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.

हेही वाचा :

वर्कआउट करताना रश्मिका मंदाना झाली जखमी?

फडणवीसांचा काँग्रेसला सुरूंग लावण्याचा प्लान ठरला

महाराष्ट्रात दारू महागणार? या कारणासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत