हिटलर अभी जिंदा है!

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर मरण (death)पावला असेल; पण त्याची विचारधारा आणि आक्रमक राजकीय महत्त्वाकांक्षा जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर मरण पावला असेल; पण त्याची विचारधारा आणि आक्रमक राजकीय महत्त्वाकांक्षा जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. (death)त्याचा वेळीच बोध न घेतल्यास, मागच्या वेळी फक्त जर्मनीचे नुकसान झाले; पण आता फक्त एकाच देशाचे नुकसान होणार नसून ते मानवजातीचे पतन असेल!

ऑस्ट्रियातील ‘ब्राऊनौ अम इन’मध्ये १३५ वर्षांपूर्वी २० एप्रिल १८८९ रोजी ॲडॉल्फ हिटलर याचा जन्म झाला. ऑस्ट्रियात जन्म घेणारा हा जर्मन पुढे जाऊन विसाव्या शतकातील एक प्रभावशाली आणि कुख्यात व्यक्ती बनणार आहे, हे तेव्हा कुणाला माहीत होते? नाझी पक्षाचा नेता म्हणून त्याचा उदय झाला आणि १९३३ मध्ये तो जर्मनीचा चॅन्सलर झाला. त्यानंतर १९३४ मध्ये ‘फ्यूरर अण्ड रिआयस्कन्झलर’ उपाधी त्याने धारण केली.

भौगोलिक विस्तार आणि वांशिक श्रेष्ठत्व अशा दोन संकल्पनांभोवती हिटलरचा जागतिक दृष्टिकोन फिरत होता. त्या विचारधारेतूनच त्याने पोलंडवर आक्रमण केले, दुसरे महायुद्ध सुरू केले आणि ‘होलोकॉस्ट’च्या दरम्यान सहा दशलक्ष ज्यू आणि लाखो इतर लोकांच्या हत्या घडवून आणल्या. हिटलरने त्या काळातील राजकीय सुंदोपसुंदी, आर्थिक संकट आणि जनतेचा असंतोष यांचा फायदा नाझी पक्षाच्या उदयासाठी केला.

जोसेफ गोबेल्सच्या प्रोपगंडाने हिटलरला एक अतिमानवी शक्ती म्हणून प्रस्थापित केले. हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाचा भलाबुरा प्रभाव आजही जगावर कायम आहे. धोरणे आणि शासन पद्धतीचा जगावर दीर्घकालीन परिणाम झाला. महत्त्वाचे म्हणजे, कोविड महामारीनंतर तर हिटलरच्या विचारधारेचे पुनरुत्थान होत आहे.

अतिउजव्यांचा उदय

युरोपमध्ये अतिउजव्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पार्टी’चा (एएफडी) उल्लेख शॉल्झ याने केला आहे. देशांतर्गत गुप्तचर संस्थेने त्याला संशयित उजवा अतिवादी गट म्हटले आहे. ‘एएफडी’च्या वरिष्ठ नेत्यांच्या एका बैठकीत परदेशी नागरिकांच्या सामूहिक हद्दपारीची चर्चा करण्यात आली, असे गुप्तचर अहवालात म्हटले गेले आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात सर्वत्र निदर्शने झाली.

‘एएफडी’सोबतच जर्मनीत इतर उजवे अतिवादी गटही आहेत. उदाहरणार्थ, रिआयस्बर्गर्स आणि निओ नाझी नेटवर्क्स हेही उजवे अतिवादी गट म्हणून समोर आले आहेत. त्या गटांची विचारधारा राष्ट्रवादी, ज्यूविरोधी, वंशवादी आणि न्यूनगंडग्रस्त आहे.

उजव्या विचारसरणीचा उदय केवळ जर्मनीपुरता मर्यादित नाही. ती एक जागतिक प्रक्रिया आहे. अनेक देशांमध्ये उजव्या विचारांच्या पक्षांना जनाधार मिळत आहे. आर्थिक परिस्थिती, स्थलांतराच्या समस्या किंवा राष्ट्रवादी भावना अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

अमेरिकेत श्वेत राष्ट्रवाद, वंशवाद आणि लोकानुनय अशा गोष्टींशी निगडित असलेल्या अतिउजव्या चळवळीचे वर्णन करण्यासाठी ‘अल्ट राईट’ संज्ञा वापरली जाते. काही इतिहासकारांच्या मते ही चळवळ आणि हिटलरचा नाझी पक्ष यांच्यात साम्य आहे. हे दोन्ही गट सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी एकाच प्रकारच्या डावपेचांचा वापर करतात, असे त्यांचे मत आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य