प्रेम व्यक्त करताना अल्पवयीन मुलीचा हात धरुन आय लव्ह यू (holding) म्हणणं मुंबईमध्ये तरुणाला चांगलेच महागात पडलेय. विशेष कोर्टानं दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.प्रेम व्यक्त करताना मुलीचा हात धरुन आय लव्ह यू म्हणणं मुंबईमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पाच वर्षानंतर याप्रकरणी विशेष कोर्टानं निर्णय दिला असून तरुणाला दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनवण्यात आली आहे.सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईतील एका 19 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. त्याप्रकरणी साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चार वर्षांपासून विशेष कोर्टात सुनवाणी सुरु होती. विशेष न्यायालयाने या तरुणाला POCSO कायद्यांतर्गत विनयभंगाच्या आरोपाखाली गुरुवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
तरुणाने न्यायालयात युक्तीवादादरम्यान सांगितले की, मुलीनेच त्याला भेटायला बोलावले होते आणि तिचे प्रेमसंबंध होते, पण न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अश्विनी लोखंडे यांनी तुरुणाला शिक्षा सुनावली. सुनावणीवेळी बोलताना न्यायाधीश लोखंडे म्हणाल्या की, आरोपीने उच्चारलेले शब्द 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच दुखावतात. न्यायालयाने 30 जुलै रोजी दिलेल्या आदेशात आरोपीला भारतीय दंड संहिता (holding)आयपीसी अंतर्गत विनयभंगासाठी दोषी ठरवण्यात आले होते.
सप्टेंबर २०१९ मध्ये साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये पीडितेच्या आईने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पीडिता घराजवळच्या दुकानात चहा पावडर घेण्यासाठी गेली होती. पण ती रडत रडत माघारी परतली. आईने मुलीकडे चौकशी केल्यानंतर सविस्तर घडलेला वृत्तांत तिने सांगितलं. पीडितेनं आईला सांगितले की, “आपल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाने हात धरला अन् आय लव्ह यू म्हटले. “
विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान आरोपीने आपण निर्दोष असल्याचं सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला. कोर्टातील युक्तावादावेळी आरोपी म्हणाला की,” त्याचं पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. तसेच मुलीनेच आपल्याला भेटायला बोलवले होते.” पण कोर्टानं आरोपीचा युक्तीवाद फेटाळून लावला. (holding)तसेच आरोपीने उच्चारलेले शब्द पीडितेच्या प्रतिष्ठेला नक्कीच दुखावतात, असे निरिक्षण नोंदवलं. पीडितेचे आरोपीसोबत प्रेमसंबंध असते तर तिने भीतीपोटी ही घटना आईला सांगितली नसती, असेही कोर्टानं आपल्या निकालात नमूद केलेय.
सुनावणीदरम्यान, न्यायाधीश अश्विनी लोखंडे म्हणाल्या की,”पीडित तरुणी चहा पावडर आणण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यावर बळाचा वापर केल्याचे सिद्ध झालेय. आरोपीने बोललेल्या शब्दांमुळे पीडितेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.” दरम्यान, वरल घटनेच्या वेळी मुलगी 14 वर्षांची होती. या घटनेच्या पाच वर्षांनंतर
हेही वाचा :
कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे
खुशखबर! आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म फक्त ५ मिनिटातच भरता येणार
पाचशे, हजार रुपयांत नव्हे तर अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’