मुंबई: हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजीमध्ये नोकऱ्यांच्या संधीत(jobs hiring) वाढ झाली असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगशी संबंधित नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्क्यांची वाढ झाल्याचं नोकरी जॉबस्पीक इंडेक्समध्ये नोंदवण्यात आलं आहे.
नोकरी जॉबस्पीक(jobs hiring) इंडेक्स हा भारतातील व्हाइट-कॉलर हायरिंगसाठी प्रमुख रोजगार इंडेक्स एप्रिल 2024 मध्ये 2643 इतका राहिला. गेल्या महिन्याच्या (मार्च 2024) तुलनेत तो स्थिर राहिला, तर गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 3 टक्क्यांनी घसरला. पण एकूण रोजगार बाजारपेठ भावनेने काही सकारात्मक बाबींना दाखवले. जसे हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजी यांसारख्या क्षेत्रांनी नोकरीच्या संधीमध्ये वाढ दाखवली. नॉन-मेट्रो शहरांनी मेट्रो शहरांना मागे टाकत आपली प्रबळ कामगिरी कायम ठेवली. तर वरिष्ठ व्यावसायिकांसाठी मागणी उच्च राहिली, ज्यामुळे अनुभवी उमेदवारांसाठी भूमिकांमध्ये उत्तम वार्षिक वाढ झाली.
नोकरी डॉटकॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी डॉ. पवन गोयल म्हणाले, “एकूण इंडेक्स स्थिर असले तरी हॉस्पिटॅलिटी, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजीमध्ये नोंद करण्यात आलेल्या उल्लेखनीय नोकरी वाढीसह नवीन आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरूवात झाली आहे. नॉन-मेट्रो शहरे मोठ्या शहरांना मागे टाकत आहेत आणि हे आगामी महिन्यांमध्ये भारतीय नोकरी बाजारपेठेसाठी उत्तम संकेत आहेत.”
हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल उद्योगाने एप्रिल 2023 च्या तुलनेत नोकरीमध्ये उल्लेखनीय 16 टक्के वाढीची नोंद केली, ज्याचे श्रेय प्रवास व पर्यटनामधील वाढीला जाते. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरी हब्समध्ये फ्रण्ट ऑफिस मॅनेजर्स, हाऊसकिपिंग सुपरवायजर्स व एफअँडबी सर्विस प्रोफेशनल्स यासारख्या पदांसाठी मागणी उच्च होती.
ऑईल अँड गॅस उद्योगाने एप्रिल 2024 मध्ये नवीन रोजगार निर्मितीत वार्षिक 15 टक्के वाढीची नोंद केली. विशेषत: अहमदाबाद, वडोदरा आणि जयपूर यांसारख्या शहरांमध्ये पेट्रोलियम इंजीनिअर्स, ड्रिलिंग इंजीनिअर्स व प्रॉडक्शन ऑपरेटर्स यासारख्या पदांसाठी मागणी सर्वाधिक होती.
एफएमसीजी उद्योगामधील नोकरीमध्ये एप्रिल 2023 च्या तुलनेत या महिन्यात 11 टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, याचे श्रेय ग्रामीण भागांमधील वाढत्या मागणीला जाते. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये सेल्स मॅनेजर्स, सप्लाय चेन एक्झिक्युटिव्ह्ज व ब्रँड मॅनेजर्स हे सर्वात लोकप्रिय प्रोफाइल्स ठरले, ज्यामुळे या विकासाला गती मिळाली आहे.
एप्रिल 2024 मध्ये आयटी उद्योगाने वार्षिक 2 टक्क्यांची माफक वाढ पाहिली, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंगशी संबंधित पदांची गती कायम राहिली, ज्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत हायरिंगमध्ये 19 टक्के वाढीची नोंद केली. मिनी-मेट्रो शहरांनी चमकदार कामगिरी केली, तर मेट्रो शहरांची गती स्थिर राहिली. अहमदाबाद (वार्षिक 10 टक्क्यांहून अधिक) व वडोदरा (8 टक्क्यांहून अधिक) यासारखी नॉन-मेट्रो शहरे नोकरीचे हॉटस्पॉट्स म्हणून उदयास आले, तर दिल्ली-एनसीआर, मुंबई व पुणे यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये स्थिर नोकरी ट्रेण्ड्स दिसण्यात आले.
अनुभवी व्यावसायिकांसाठी मागणी उच्च राहिली, जेथे 13 ते 16 वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी पदांमध्ये वार्षिक 9 टक्क्यांची वाढ झाली आणि 16 वर्षांहून अधिक काळाचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीमध्ये उल्लेखनीय 21 टक्क्यांची वाढ झाली. पण, अनुभवी व्यावसायिकांसाठी प्रबळ मागणीच्या तुलनेत एण्ट्री-लेव्हल नोकरीची मागणी कमी राहिली.
हेही वाचा :
हातकणंगले लोकसभेला जमलेली गट्टी विधानसभेला ….
सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे EPFO खातेधारकांचे टेन्शन मिटले
लोकसभेत एकी, पण विधानसभेचं काय? कोल्हापुरातील सहा जागांसाठी ‘असं’ असणार गणित..