नवऱ्याने भर रस्त्यात धारधार शस्त्राने बायकोवर केला हल्ला  VIDEO

मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एका धक्कादायक घटनेने शहरात(road) खळबळ माजवली आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोवर प्राणघातक हल्ला केला आहे. नवऱ्याने भर रस्त्यात धारधार शस्त्राने महिलेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गिरगावात नवऱ्याने(road) बायकोवर जीवघेणा हल्ला केला आहे. बायको ऑफिसला जाताना नवऱ्याने धारधार शस्त्राने गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ल्यानंतर नवऱ्याने स्वत:चाही हात कापून घेतला आहे.

बायको विभक्त राहत असल्याच्या रागातून नवऱ्याने हा हल्ला केल्याचे समजते. या प्रकरणी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर महिला आणि पुरुष दोघांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

महिलेने काही दिवसांपूर्वी नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त राहत असल्याच्या रागातून पतीने तिला ऑफिसला जाताना गाठले. त्यानंतर नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून तिला जखमी केले.

हल्ल्यानंतर नवऱ्याने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापून स्वत:ला जखमी केले. जखमी महिलेला गिरगावमधील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर जखमी नवऱ्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी जखमी महिलेचा जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी-शिरदवाड मार्ग बंद! पूरग्रस्त नागरिक परतू लागले घरी

गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल

‘तुझं लग्न कधी होणार?’ प्रश्नाने झाला हैराण, अखेर शेजाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल