ह्युदांई ही प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीने Hyundai i10 ही हॅचबॅक(version control) कार नवीन अवतारात बाजारात लाँच केली आहे. या हॅचबॅक कारची विक्री सातत्याने कमी होत होती. त्यामुळेच कंपनीचे आता Grand i10 NIOS चे कॉर्पोरेट प्रकार सादर केले आहेत. ही कार नवीन फीचर्ससह बाजारात लाँच करण्यात आली आहे.
Grand i10 NIOS कार गेल्या अनेक महिन्यांपासून(version control) बाजारात आहे. परंतु कारची मागणी सातत्याने कमी होत होती. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीची ही नवीन कारची किंमत ६.९३ लाख रुपये आहे.
फीचर्स
Grand i10 NIOS कारमध्ये कॉस्मॅटिक बदल करण्यात आले आहे. कारच्या बाह्य भागामध्ये काळ्या रेडिएटर ग्रिल, बॉडी कलर आउट साइड रिअर व्यू मिरर (ORVM), डोअर हँडल, डे टाइम रनिंग लाइट्ससोबत LED टेव लाइट आणि ड्युअल टोन अलॉय व्हील देण्यात आले आहे. हे कार रेग्युलर मॉडेलपेक्षा अधिक चांगले बनवते.
कारच्या इंटेरिअर ड्युअल टोन ग्रे कलरचे आहे. या कारमध्ये ड्रायव्हर सीट अॅडजस्टमेंट, फॉलोइंग लाइट्स, फ्रंट फॉग लँप, फ्रंट पॅसेंजर सीट बॅक पॉकेट, ६.७ इंचाची टचस्क्रिन इंफोटेमेंट सिस्टीम, माउंटेड स्टीअरिंग व्हील यांसारखे फीचर्स देण्याल आले आहे. कारचे इंटेरिअर खूप जास्त प्रीमीयम पद्धतीचे आहे.
Grand i10 NIOS कारच्या कॉर्पोरेट व्हेरियंटमध्ये 8.89 सेमीचे स्पीडोमीटर, मल्टी फंक्शन डिस्प्ले, रिअर AC वेंट्स, ऑटो डाउन पावर विंडो, USB आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 4 स्पीकर, पॅसेंजर व्हॅनिटी मिरर हे फीचर देण्यात आले आहे. ही कार ७ मोनोटोन कलरमध्ये उपलब्ध आहे.
कारमध्ये ६ एअरबॅग, टायर प्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम, सर्व सीटला सीट बेल्ट रिमाइंडर, नो राइट रिअर व्यू मिरर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सोबत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) सेंट्रल डोअर लॉकिंग सिस्टीम यासारखी सुविधा देण्यात आली आहे.
कंपनीने या कारला दोन व्हेरियंट्समध्ये लाँच केले आहे. कंपनीच्या कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 83 PS ची पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. कारला 5- स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आले आहे. कारच्या मॅन्युअल व्हेरियंटची किंमत ६,९३,२०० रुपये तर ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत ७,५७,९०० रुपये आहे.
हेही वाचा :
‘आमचं ठरलंय’नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा
Jr NTR ‘वॉर २’च्या शूटिंगसाठी मुंबईत दाखल, हृतिक रोशनसोबत करणार ॲक्शन सीन्स