सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार(Suresh Dhas) सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केले आहे.

तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुराज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडी मुन्नी यांना बोलायला लावत आहे मात्र मुन्नीला म्हणा तू इथे ये आणि मी इथे कोणाबद्दल बोलत आहे हे मला आणि मुन्नीला माहिती आहे. असं भाजप आमदार (Suresh Dhas)सुरेश धस म्हणाले होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुन्नी कोण ? याबाबात अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यातच सुरेश धस यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत मी मुन्नाभाई एमबीबीएस असुन माझा मुन्नीशी कोणताही कॉन्टॅक्ट नाही असा खुलासा केला आहे.
भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, मुन्नी राष्ट्रवादीची आहे. त्या मुन्नीला देखील माहिती आहे आणि ती मुन्नी महिला भगिनी नाही आहे. जी मुन्नी आहे. त्याला पक्के माहिती आहे की हे मलाच म्हटलेला आहे. कारण मी त्याला एक वेळा मुन्नी म्हणून बोललो होतो. तसेच जेव्हा मुन्नी बोलेल तेव्हा मी देखील सांगेन ही मुन्नी आहे म्हणून असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, मुन्नीशी कॉन्टॅक्टची गरज नाही. मुन्नी दुसऱ्या पक्षाची आहे आणि मी इकडे आहे. मी मुन्नाभाई एमबीबीएस आमचं काय? तसेच मुन्नी राष्ट्रवादीची आहे आणि आता सँस्पेंस राहू द्या, काही दिवसांनी मुन्नी पुढे येणार आहे. मुन्नी पुढे आल्यानंतर मजा येणार असेही ते म्हणाले. सुराज आणि अमोल माझ्या विरोधात काय बोलणार? यांना मागून बोलायला लावला जात आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

तर अमोल मिटकरी यांची आता आमदारकी जवळ आली आहे. पुन्हा भेटावी म्हणून माझ्या विरोधात बोलत आहे मात्र अमोल मिटकरी चुकीच्या विषयामध्ये बोलत आहे. असं देखील सुरेश धस म्हणाले.
हेही वाचा :
सांगलीत पोलीस स्टेशनसमोरच फ्री स्टाईल हाणामारी: नेमका काय प्रकार घडला?
धक्कादायक ! पत्नीवर चाकूने सपासप वार; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Viral Video: मोबाईलमध्ये गुंग तरुणाचा रस्ता ओलांडताना थरारक अपघात!