मी लोकसभा बोलतेय भाग- 18:राजीव गांधींच्या कार्यकाळात संगणक ,दूरसंचार क्रांती

निवडणुकीनंतर राजीव पुन्हा पंतप्रधान झाले. खासदारांच्या संख्येच्या बाबतीत आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली सरकार(govt). राजीव सरकारने अनेक महत्त्वाची कामे केली.

देशात संगणकीकरण आणि दूरसंचार क्रांतीचे श्रेय राजीव सरकारला(govt) जाते. या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३% आरक्षण लागू केले. मतदारांचे वय २१ वरून १८ वर्षे केले. दरम्यान, बोफोर्स तोफा सौद्यातील दलालीचा मुद्दा पुढे आला.

वृत्तपत्रांनी मथळा छापला – “बोफोर्स ताेफांमध्ये लाचखाेरीचे गोळे” राजीव सरकारमधील मंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली. चौधरी देवीलाल, मुलायमसिंह आणि लालू यादव यांच्यासारखे नेते त्यांच्यासाेबत गेले. व्हीपी सिंह यांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी राजीव गांधींनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली आणि १९८९ मध्ये निवडणुका जाहीर केल्या. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जनता दलाला १४३ जागा मिळाल्या तर भाजपची संख्या दोन वरून ८५ वर पाेहाेचली. जनता दलाने भाजप आणि इतर पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले. व्हीपी सिंह पंतप्रधान झाले. देवीलाल उपपंतप्रधान. राजीव गांधींनी अयोध्येत पायाभरणी नक्कीच केली पण भाजपने हा मुद्दा उचलून धरला. हा पक्ष मंदिर बांधण्यावर ठाम होता.

अडवाणींचा रामरथ रोखून लालूंनी भाजपचे नाक पकडले. दुसरीकडे बिहारमध्ये अडवाणींना अटक करण्यात आली. दिल्लीत भाजपने व्हीपी सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. बहुमत सिद्ध करू न शकल्याने व्हीपी सरकार पडले आणि १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केले. या काळात आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या. चंद्रशेखर सरकारही सात महिन्यांनी पडले. दहाव्या लोकसभेसाठी पुन्हा मे-जून १९९१ मध्ये निवडणुका झाल्या. दरम्यान २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. भाजपने ८५ वरून १२० जागांपर्यंत मजल मारली. जनता दल ५९ वर अडकला. केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

हेही वाचा :

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल

पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय