कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा (Assembly)संघर्ष लक्षात घेऊनच तिथेही विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे. इचलकरंजीला भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपचे विद्यमान सहयोगी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यात चुरस असेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून बंडखोरीची घोषणा प्रकाश आवाडे यांनी केली होती; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी बंडखोरी केली नाही. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून काय शब्द घेतला, त्यावर येथील चित्र अवलंबून असेल.
तेथे महाविकास आघाडीही स्ट्राँग आहे.जिल्ह्यातील (Assembly)दहापैकी या तीन मतदारसंघांत महापालिकेच्या जोडण्या विचारात घेऊनच विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे.महापालिकेच्या राजकारणाचा संदर्भ याला आहेच, त्याचबरोबर आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीचाही संदर्भ असल्याने याला वेगळे महत्त्व आले आहे. त्याचबरोबर इचलकरंजीला महापालिका झाली आहे. त्याची पहिली निवडणूक व्हायची आहे. महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या तेव्हा होतील; मात्र त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी विधानसभेची झुंज कडवी असेल.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला. हाळवणकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे विधानसभेला प्रतिनिधित्व केले आहे. आवाडे यांनी त्यांचा 49 हजार 810 मतांनी पराभव केला. आवाडे यांना 1 लाख 16 हजार 886, तर हाळवणकर यांना 67 हजार 76 मते मिळाली होती.
हेही वाचा :
इचलकरंजीत मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा…
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ
बच्चूभाऊंची सटकली! शिंदेंची साथ सोडणार? विधानसभा निवडणुकीत ‘इंगा’ दाखवणार