सध्या पावसाने थोडीफार उघडीप दिल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची(Flood) पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीला आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी अद्याप कर्नाटक मार्ग सुरू झालेला नाही. यशोदा पुलाजवळ पाणी असल्यामुळे कर्नाटक राज्याशी जोडणारा इचलकरंजी – शिरदवाड मार्ग सुरू होण्यासाठी अजून तीन दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूरग्रस्त(Flood) नागरिक आपल्या घरी परतू लागले आहेत. सध्या दोन निवारा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत, ज्यामध्ये १२७ कुटुंबातील ५०४ पूरग्रस्त नागरिक राहत आहेत. पूराचे पाणी अत्यंत संथगतीने ओसरत असल्यामुळे अद्यापही पाणी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. काही भागातील पूर ओसरल्यामुळे नागरिक आपापल्या घरी परतत आहेत, त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या आता १० वरून ८ वर आली आहे.
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ९० कुटुंबातील ३५५ नागरिक राहात आहेत, तर मंगलधाममधील ३७ कुटुंबातील १४९ नागरिक पूर ओसरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पूराची पातळी संथगतीने कमी होत असल्यामुळे यशोदा पुलाजवळील पाणी कमी होण्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती आपत्ती निवारण विभागाचे संजय कांबळे यांनी दिली.
हेही वाचा :
Whatsapp वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचं! 35 स्मार्टफोनमध्ये बंद होणार व्हॉट्सॲप
‘तुझं लग्न कधी होणार?’ प्रश्नाने झाला हैराण, अखेर शेजाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल