इचलकरंजीत काही काळ तणाव! स्वाभिमानी – ठाकरे आमनेसामने

इचलकरंजीत राजू शेट्टी यांची पदयात्रा होती तर सत्यजीत पाटील(tension) हे पण प्रचारासाठी शहरात होते. दोघांचे समर्थक शाहू चौकात समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरु केला. स्वाभिमानी शेतकरीची पदयात्रा ही कोहिनूर चौकातून इचलकरंजीच्या दिशेने जात होती. ही पदयात्रा शाहू चौकात आली. तर सत्यजीत पाटील यांची पण रॅली याच चौकात आली. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यानंतर एकच घोषणाबाजी सुरु झाली.

कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाच्या घोषणा(tension)सुरु केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी दोन्ही गट हटायला तयार नसल्याने गोंधळात अजून भर पडली.कार्यकर्ते हटायला तयार नव्हते. घोषणाबाजीमुळे हा परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते सरसावले. पोलिसांनी पण दोन्ही गटांन दूर करण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढल्याने शाहू चौकात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तर उद्धव ठाकरे गटाकडून सत्यजीत पाटील सरुडकर, शिंदे सेनेकडून धैर्यशील माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. यावेळी हातकंणगले लोकसभा मतदारसंघात चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी, महाविकास आघाडी, महायुतीसोबतच वंचित पण मैदानात उतरल्याने या मतदारसंघात रंगत वाढली आहे. कोण-कोणाला धोबीपछाड देते, यावर खल सुरु आहे. कार्यकर्ते अंदाज बांधत आहेत.

हेही वाचा :

सई ताम्हणकर दिसणार आणखी एका बॉलिवूड चित्रपटात

शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर

मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी