न्याय मिळाला नाहीतर… धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही; मनोज जरांगेंची गर्जना

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी परभणीत मुक मोर्चा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(politics) यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, यापुढे जर देशमुख यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, धनंजय मुंडेंला रस्त्याने फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला तो सहन केला, पण यापुढे देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर एकाला देखील रस्त्याने फिरू देणार नाही.

आम्हाला माज, मस्ती नाही. पण तुम्ही जर आमचे लेकरं उघड्यावर पाडत असाल. यांना पुण्यात नेमकं सांभाळलं कुणी? सगळे आरोपी पुण्यातच का सापडत आहेत? याचा अर्थ सरकारमधले(politics) मंत्री आरोपींना सांभाळत आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी केलीय.

सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केलीय. जर चार्जशीट कच्च झालं अन् आरोपी बाहेर आला तर मग मंत्री गोट्यांनी हाणलाच म्हणून समजा, असा इशारा जरांगेंनी दिलाय. संतोष देशमुख यांच्या बाजूने बोलल्यास जातीवादी, मग तुम्ही संतोष भैय्याला क्रूरपणे मारलं, तो जातीवाद नाही का? असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय.

पुढील काळात जर समाजावर हल्ले झाले, तर उत्तर तसंच द्यायचं. समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. महायुती असो किंवा महाविकास आघाडी जो आपल्या बाजूने बोलेल, मराठ्यांनी त्याच्याच पाठीमागे उभं राहायचं. देशमुख कुटूंब एकटं नाही, राज्यातील सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. कायद्याने न्याय दिला नाही, तर हा मनोज जरांगे अन् व्यासपीठावर बसलेले सर्व मराठे संतोष देशमुख यांना न्याय देवू, असा शब्द मनोज जरांगे यांनी दिलाय.

उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे. संतोष भैय्याच्या लेकीने आपल्याला हाक दिलीय. सर्वांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. पण ज्यावेळेस काळजाला बाण लागले , त्यावेळी पक्ष, सामाजिक संघटना बाजूला ठेवून एकत्र या. वेळ आली तर पुन्हा बीडसह राज्यात पुन्हा मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देवू.

पकडलेल्या सगळ्या आरोपींवर 302 लावा. ज्यांनी आरोपीला सांभाळलं, आरोपीला गाडीत घेवून पुण्यात गेले. त्या सर्व लोकांना आरोपी करा, अशी विनंती परभणी जिल्ह्यातून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्‍यांवर विश्वास आहे, असं देखील जरांगे पाटील म्हणालेत.

खंडणी मुळेच हत्या झाली, असं मनोज जरांगे म्हणालेत. ज्या दिवशी मराठ्यांना वाटेल मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्‍यांना, आमदारांना आणि आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यादिवशी मराठे आणि सरकार यांचा समोरासमोर सामना होईल, असं मनोज जरांगे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्र्‍यांना सांगितलं आहे.

हेही वाचा :

जयंत पाटलांचा पत्ता कट होणार? राष्ट्रवादी हालचालींना वेग

शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला जात गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं? Viral Photo मुळे खळबळ

छतावर स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, जमिनीवर कोसळला अन्… Video Viral