टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली पाच(tour) सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. भारतीय संघ या दौऱ्यातील शेवटचा सामना 15 जुलै रोजी खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडिया या दौऱ्यावर(tour) नवीन कोच आणि नवा कर्णधार घेऊन जाऊ शकते. पण श्रीलंकेसोबतच्या वनडे आणि टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल, हा मोठा प्रश्न आहे.
रोहित शर्मा ब्रेकवर
टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा आता ब्रेकवर गेला आहे. अशा स्थितीत श्रीलंका दौऱ्यावर त्याची वनडे मालिका खेळण्याची शक्यताही कमी असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यासाठी रोहितशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
भारताला जुलैच्या अखेरीस श्रीलंकेसोबत एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. रोहित आणि विराट याआधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. दरम्यान आता एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा होत आहे.
केएल राहुल किंवा हार्दिक पांड्या
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठी हार्दिकला कर्णधार बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो, परंतु त्यात केएल राहुल देखील आहे.
बीसीसीआय केएल राहुलकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. केएल राहुल आयपीएल 2024 पासून क्रिकेट क्षेत्रापासून दूर आहे, त्याला 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघातही संधी मिळाली नाही. मात्र आता राहुल श्रीलंका दौऱ्यातून संघात पुनरागमन करू शकतो. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. अशा परिस्थितीत राहुल पुन्हा एकदा कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, रोहित आणि विराट स्वतः वनडे संघात पुनरागमन करण्याचे संकेत देतील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला इंग्लंडसोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, जी त्यांच्यासाठी पुरेशी आहे. पुढील काही महिन्यांत हे दोन्ही खेळाडू कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करतील, कारण टीम इंडियाला सप्टेंबर ते जानेवारी 2025 या कालावधीत 10 कसोटी सामने खेळायचे आहेत.
हेही वाचा :
श्रीकृष्णाने दिलेला एकमेव शाप: अश्वत्थाम्याची हकालपट्टीचे रहस्य
महाराष्ट्रात १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या: सुरक्षाव्यवस्थेत मोठे फेरबदल
पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.7 फुटांवर: कोल्हापूर जिल्ह्यात सतत निगराणी जारी