बीएसएनएल वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्त्वाची (BSNL)बातमी आहे. कंपनीने सुरू केलेली ‘होळी धमाका ऑफर’ आता फक्त 10 दिवसांसाठीच उपलब्ध आहे. 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे दीर्घ वैधतेचा फायदा घेण्यासाठी युजर्सनी लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. या ऑफर अंतर्गत दोन प्रमुख प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सवर अतिरिक्त दिवसांची वैधता दिली जात आहे.बीएसएनएलने या ऑफरमध्ये 1,499 रुपयांचा आणि 2,399 रुपयांचा प्लॅन समाविष्ट केला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही प्लॅन्समध्ये आता वाढीव वैधता दिली जात आहे. त्यामुळे वर्षभरासाठी मोबाईल सेवा घेणं अधिक किफायतशीर ठरत आहे.

1,499 रुपयांचा वार्षिक प्लॅन – आता मिळेल 365 दिवसांची सेवा :
या प्लॅनमध्ये याआधी 336 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र, होळी धमाका ऑफर अंतर्गत आता 29 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळून हा प्लॅन थेट 365 दिवसांसाठी वैध झाला आहे. यामध्ये युजर्सना भारतात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 100 फ्री SMS रोज आणि एकूण 24GB डेटा मिळतो. हा डेटा वर्षभरात केव्हाही वापरता येतो.BSNL च्या ‘X’ Twitter हँडलवरून याबाबत माहिती (BSNL)देण्यात आली असून, 31 मार्चनंतर ही वाढीव वैधता बंद होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरा प्लॅन म्हणजे 2,399 रुपयांचा सुपर प्लॅन, ज्यामध्ये याआधी 395 दिवसांची वैधता होती. आता कंपनीने त्यात 30 दिवसांची वाढ करून एकूण वैधता 425 दिवसांपर्यंत दिली आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह नॅशनल रोमिंग मिळते. दीर्घकालीन आणि डेटा आवश्यकतेसाठी हा प्लॅन आदर्श ठरू शकतो.जर तुम्हाला दरमहा रिचार्जचा त्रास नको असेल आणि (BSNL)एकदाच दीर्घ सेवा हवी असेल, तर BSNL चा हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.दरम्यान, 31 मार्च ही अंतिम तारीख असल्याने युजर्सनी लवकरात लवकर रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घ्यावा. एकदा ही ऑफर संपल्यावर वाढीव वैधता मिळणार नाही. विशेषतः ग्रामीण भागात आणि BSNL सिम वापरणाऱ्यांसाठी ही ऑफर अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा :
कोल्हापूर :विशाळगडावर नेऊन मित्राचा चिरला गळा अन् दरीत फेकला मृतदेह
उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय? आताच सावध व्हा! नाहीतर…
‘रेखा फक्त पैसे न देणाऱ्यांसोबत.. राकेश रोशन यांनी उघड केला खरा चेहरा